बॉलिवूडची बेबो म्हणजे अभिनेत्री करीना कपूर खान ही इंडस्ट्रीतील दोन मोठ्या कुटुंबांशी जोडली गेलेली आहे. एकेकडे ती कपूर घराण्याची लेक आहे तर दुसरीकडे खान म्हणजेच नवाबांची सून म्हणूनही ती परिचित आहे. करीनाने तिच्या अभिनयातून स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली. ती फक्त नवाबांची सूनच नसून ती दोन लेकांची आईदेखील आहे. तैमूर अली खान व जहांगीर अली खान ही तिच्या मुलांची नावं आहेत. करीना एक अभिनेत्री असली तरीही ती एक आईदेखील आहे. त्यामुळे ती नेहमी तिच्या जबाबदाऱ्या पूर्ण करताना दिसते. ती तिच्या व्यावसायिक आयुष्यात व्यस्त असतानाही वैयक्तिक आयुष्याकडे कधीही दुर्लक्ष करत नाही. नुकतंच तिने एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला. जेव्हा तिची मुलं आपापसात भांडतात तेव्हा ती त्यांच्यातील भांडणं कशाप्रकारे सोडवते याबद्दल तिने सांगितलं. (kareena talks about her parenting tricks)
करीना एक उत्तम अभिनेत्री आहेच पण तिच्या कामातून ती वेळ काढत बराचसा वेळ स्वतःच्या मुलांसाठी नेहमी देत असते. यासंबंधित बऱ्याच गोष्टी तिने ‘एक्स्प्रेस अड्डा’ या कार्यक्रमात सांगितल्या. यावेळी सांगताना तिने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील बऱ्याच गोष्टींबाबत खुलासा केला. करीना म्हणाली, “मला वाटतं की ४० वय हा आयुष्यातील सर्वोत्तम टप्पा आहे. मुलं झाल्यानंतर तर मला असं वाटतं की मी पहिल्यापेक्षा हे आयुष्य खूप छान प्रकारे जगते आहे. कारण याच सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे घेऊन जातात”.
करीना पुढे सांगते की, “मी माझ्या मुलांसाठी कोणतीही गोष्ट खरेदी करताना प्रत्येकवेळी दोन गोष्टी खरेदी करते. आम्ही विमानतळावर असो किंवा आणखी कुठेही सैफला मी नेहमी दोन गोष्टी हुबेहुब सारख्या खरेदी करायला सांगते. जेणेकरून मुलांमध्ये भांडणं होऊ नयेत”.
करीनाने तैमूरबाबतही काही गोष्टी सांगताना म्हणाली, “जेव्हा तैमूरला समजायला लागलं की मीडिया त्यांचे फोटो काढते तेव्हा त्याने या मागचं कारण विचारलं. त्यावर उत्तर देताना करीना म्हणाली, अब्बा चित्रपटांमध्ये काम करतात आणि ते बरेच प्रसिद्ध आहेत त्यामुळे फोटोग्राफर फोटो घेत असतात”, असं उत्तर करीनाने यावेळी दिलं.