Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ मध्ये प्रेमाचे बंध फुलताना पाहायला मिळत आहे. यंदाच्या सीझनमध्ये असं पाहायला मिळत आहे की अगदी ग्रँड प्रीमियरच्याच दिवशी दोन स्पर्धकांमध्ये प्रेमाचे बंध पाहायला मिळाले. अभिनेता अरबाज पटेल व अभिनेत्री निक्की तांबोळी यांनी घरात येतानाच प्रेमाची लक्षणे असल्याचा इशारा दिला. हे पाहून प्रेक्षकांमध्येही उत्सुकता वाढलेली पाहायला मिळाली. त्यांनतर ‘बिग बॉस’च्या घरातही प्रेक्षकांना निक्की व अरबाज यांचा रोमान्स पाहायला मिळाला.
‘बिग बॉस मराठी’च्या भागात निक्की व अरबाज यांच्यात फुलत जाणार प्रेम पाहायला मिळालं. सुरुवातीला तर अरबाजने निक्की साठी स्पेशल टोमॅटोचे हार्टही बनवले होते. तर बरेचदा अरबाज व निक्की एकमेकांची काळजी घेताना दिसले. मात्र ही मैत्री, हे प्रेम जास्त दिवस टिकलेलं दिसलं नाही. अगदी पहिल्या आठ्वड्यापर्यंत ‘बिग बॉस’च्या घरात निक्की व अरबाज यांच्यात फुलणार प्रेम पाहायला मिळालं. मात्र त्यानंतर हे प्रेम काहीस दिसेनासं झालं.
सलग दुसऱ्या आठवड्यात निक्की नॉमिनेट झाली. यावेळी अरबाजने निक्कीला नॉमिनेट केलं. ही गोष्ट निक्कीला प्रचंड खटकली. अशातच या शोचा एक नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, निक्की अरबाजवर प्रचंड संतापलेली दिसत आहे. दोघांमध्ये प्रचंड राग पाहायला मिळत आहे. याआधीही अरबाजने निक्कीला इगो दाखवला होता तेव्हा देखील त्यांच्यात वाद झाला. मात्र सहस्पर्धकांनी हा वाद मिटवला.
समोर आलेल्या प्रोमोमध्ये निक्की अरबाजलावर राग व्यक्त करते. अरबाजने टास्कमध्ये लसूण निवडली. यावरुन, निक्की म्हणते माझ्यापेक्षा त्याला जास्त महत्त्वाची लसूण आहे. आणि एवढं प्रेम दाखवूनही त्याने मला नॉमिनेट केलं”. अशाप्रकारे निक्कीने अरबाजवर संताप व्यक्त केला. ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या आठवड्यात पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, सुरज चव्हाण, निखल दामले, निक्की तांबोळी आणि घन:श्याम दरवडे हे सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आता या सहा सदस्यांमधून या आठवड्यात कोण ‘बिग बॉस मराठी’च्या घराचा निरोप घेणार हे पाहणं रंजक ठरेल.