बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या खूप चर्चेत आहे. मनोरंजनाकडून तिने सध्या मोर्चा राजकारणाकडे वळवला आहे. हिमाचल प्रदेश येथील मंडी या विभागातून ती निवडून आली होती. सोशल मीडियावरदेखील कंगना अधिक सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. तिची मतं ती परखडपणे मांडताना दिसते. तसेच तिच्या सोशल मीडिया पोस्टदेखील व्हायरल होताना दिसतात. नुकतीच तिने केलेली पोस्ट आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. कंगनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो समोर आला आहे. हा फोटो चांगलाच चर्चेत आला आहे. कंगनाने नक्की काय पोस्ट केले आहे? याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. ( kangana ranaut on ladies spg commando)
‘हिंदुस्तान टाइम्स’च्या रिपोर्टनुसार, कंगनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये एक महिला एसपीजी कामांडो दिसून येत आहे. हा फोटो बघून कंगनाला आनंद झालेलादेखील दिसून येत आहे. २०१५ पर्यंत एसपीजीच्या क्लोज प्रोटेक्शन टीममध्ये एकही महिला समाविष्ट नव्हती. आता इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, या विभागात आता १०० महिला कमांडो आहेत.
माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांनी एप्रिल १९८५ साली कॅबिनेट सचिवालयाअंतर्गत एसपीजीची स्थापना केली. त्यानंतर १९८८ साली पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी एसपीजी अधिनियम लागू करण्यात आला. दरम्यान हा फोटो शेअर करत गर्वाने मान उंचावल्याचे कंगनाने म्हंटले आहे.
दरम्यान कंगनाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तिचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट अधिक चर्चेत आहे. ट्रेलर समोर आल्यानंतर विविध स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये अशी मागणीदेखील करण्यात आली आहे. तसेच सेन्सॉर बोर्डानेदेखील चित्रपटातील काही सीनवर बंदी घालण्यात यावी असेही सांगण्यात आले आहे. मात्र यामध्ये काहीही चुकीचे दाखवले नसल्याचे कंगनाचे म्हणणे आहे. या चित्रपटात कंगना देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात कंगनाबरोबर अनुपम खेर, श्रेयस तळपदे, मिलिंद सोमण असे अनेक कलाकार आहेत. हा चित्रपट २०२५ साली प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.