बॉलीवूड अभिनेत्री कंगना ही संध्या राजकारणामुळे अधिक चर्चेत आली आहे. ४ जून रोजी ती हिमाचल प्रदेशमधील मंडी या विभागातून निवडून आली. त्यानंतर दिल्ली येथे जात असतानाच चंदीगढ एअरपोर्टवर तिच्याबरोबर एक प्रसंग घडला आणि सर्वत्र त्याबद्दल चर्चा सुरु झाली. एका CISF महिला कॉन्स्टेबल कुलविंदर कौरने सिक्युरिटीदरम्याने कानशीलात लगावली. त्यानंतर संबंधित महिला कॉन्स्टेबलला निलंबितही करण्यात आले. सोशल मीडियावर स्वतः कंगनाने घडलेला प्रकार सांगितला. मात्र याबद्दल बॉलीवूडकरांनी याबद्दल मौन बाळगले. त्यावरुनही कंगनाने सोशल मीडियावर पोस्ट करत बॉलीवूड करांवर निशाणा साधला. (kangana on slap controversy)
त्यानंतर कलाकारांनी घडलेल्या प्रकारावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. बॉलीवूड आता दोन भागात विभागले गेले असून कही जण कंगनाला पाठिंबा देत आहेत तर काहीजण कुलविंदरची बाजू घेताना दिसत आहेत. गायक विशाल ददलानीनेही महिला कॉन्स्टेबलला पाठिंबा दिला असून तिला नोकरी देण्याचेही आश्वासन दिले आहे. तसेच पाठिंबा देण्याऱ्यांनी कुलविंदरला कायदेशीर मदत करणार असल्याचेही सांगितले.
Every rapist, murderer or thief always have a strong emotional, physical, psychological or financial reason to commit a crime, no crime ever happens without a reason, yet they are convicted and sentenced to jail.
— Kangana Ranaut (Modi Ka Parivar) (@KanganaTeam) June 8, 2024
If you are aligned with the criminals strong emotional impulse to…
आता कंगनाने पुन्हा एकदा या प्रकरणावर भाष्य केले आहे. तसेच आपला रागदेखील व्यक्त केला आहे. ज्या लोकांनी महिला कॉन्स्टेबलचे समर्थन करणाऱ्यांच्या विरोधात सोशल X वर मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “प्रत्येक बलात्कारी, खूनी किंवा चोराकडे गुन्हा करण्यासाठी नेहमी भावनिक, शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक अशी अनेक कारणं असतात. कधीही कोणताही अपराध हा कारणाशिवाय होत नाही. तरीही त्यांना दोषी ठरवले जाते आणि शिक्षा सुनावली जाते”.
पुढे कंगनाने लिहिले आहे की, “पण लक्षात ठेवा की कोणाच्याही खासगी आयुष्यात येणे, परवानगीशिवाय हात लावणे किंवा हल्ला करणे जर योग्य असेल तर बलात्कार व हत्या यामध्येही काही गैर नसावे. तुमची मनोवृत्तिदेखील अशी असेल तर तुम्ही तुमचे मानसिक आरोग्य तपासून पाहा. योगा, ध्यान अशा गोष्टींचा सराव करा. नाहीतर आयुष्य खूप कठीण बनेल. मनावर ओझं निर्माण होईल. एखाद्याबद्दल इतकी घृणा व ईर्षा मनात ठेऊ नका. स्वतःला स्वतंत्र करा”.
कंगनाला एअरपोर्टवर ज्या CISF महिला कॉन्स्टेबलने कानशिलात लगावली तिच्या विरोधात तक्रार नोंदविण्यात आली आहे. कुलवींदरच्या विरोधात IPC कलम ३२३ व कलम ३४१ अंतर्गत तक्रार नोंदविण्यात आली आहे.