सोमवार, मे 12, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आधी उर्मिला मातोंडकरला सॉफ्ट पॉर्न स्टार म्हणून डिवचलं, नंतर मात्र सनी लिओनीचं नाव घेत कंगनाने केली सारवासारव, म्हणाली, “आपल्या देशात…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 28, 2024 | 11:35 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
kangana ranaut on sunny leone

आधी उर्मिला मातोंडकरला सॉफ्ट पॉर्न स्टार म्हणून डिवचलं, नंतर मात्र सनी लिओनीचं नाव घेत कंगनाने केली सारवासारव, म्हणाली, “आपल्या देशात...”

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. नुकतेच भारतीय जनता पक्षाने तिला हिमाचल प्रदेशातील मंडी या भागातून निवडणुकीचे तिकीट दिले आहे. लोकसभा निवडणूक २०२४ च्या निवडणुकांच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये कंगनाचेही नाव समाविष्ट असल्याचे दिसून आले. त्यानंतर सर्व स्तरातून आश्चर्य व्यक्त केले गेले. अशातच तीच्या कही जुन्या मुलाखतीचे विवादात्मक व्हिडीओदेखील व्हायरल झाले. त्यामुळे आता ती पुन्हा चर्चेत आली आहे. (kangana ranaut on sunny leone)

कंगनाला तिकीट मिळाल्यानंतर तीचे अनेक जून व्हिडीओ व ट्विट समोर येताना पाहायला मिळत आहे. त्यातील एक म्हणजे कंगना व उर्मिला मातोंडकर यांचा वाद. कंगनाने २०२० साली उर्मिलाबाबत एक विवादात्मक भाष्य केले होते. उर्मिलाला कंगनाने ‘सॉफ्ट पॉर्न स्टार’ म्हणून संबोधले होते. त्यावर दोघींमध्ये खूप वाद झाले होते. त्याबद्दल कंगनाला विचारले असतं तिने यामध्ये अभिनेत्री सनी लिओनीबद्दलही वक्तव्य केलं होतं. ती म्हणाली की, “सॉफ्ट पॉर्न स्टार किंवा पॉर्न स्टार हे शब्द आपत्तीजनक आहेत? नाही. यामध्ये काहीही आपत्ती जनक नाही. हा एक असा शब्द आहे ज्याला समाजाने स्वीकारले नाही”.

आणखी वाचा – ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील आशुतोषचा मृत्यू मराठी कलाकारांनाही बघवेना, सुप्रसिद्ध अभिनेता कमेंट करत म्हणाला, “अरुंधतीला त्याच्याशिवाय पाहणं…”

View this post on Instagram

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

पुढे ती म्हणाली की, “आपल्या देशामध्ये जितका पॉर्नस्टारला सन्मान मिळतो तितका पूर्ण जगात कुठेही मिळत नाही. याबद्दल हवे असल्यास सनी लिओनीला विचारा”.

आणखी वाचा- लंडनमध्ये शेक्सपिअरच्या घरी पोहोचले प्रवीण तरडे, घराबाहेरील ‘त्या’ गोष्टीने वेधलं लक्ष, म्हणाले, “आपले भारतीय…”

दरम्यान उर्मिलावर प्रतिक्रिया देत म्हणाली की, “मला उर्मिला यांच्यावर बोलण्यास सांगितले होते. मला भाजप कोणत्या आधारावर राजकारणात आणण्यासाठी विचार करेल? त्यावर माझे  उत्तर होते की कलेची विविध क्षेत्र आहेत. यामध्ये अनेक कला आहेत ज्यामध्ये शारीरिक स्वरूपात उत्तेजना मिळते. पण हे देखील कलेचे एक रूप आहे. पण जी बौद्धिक कला आहे त्यासमोर ही कला फिकी पडते”.

पुढे ती म्हणाली की, “मी व्यक्तीगत स्वरूपात मान्य करते की मी या क्षेत्रातून समोर आले आहे. मी कधीही आयटम सॉंग केले नाही. त्यामुळे मी इतकंच म्हणाले की उर्मिला जर एखाद्या पक्षात सहभागी होत असेल तर मी साहजिकच चांगले काम केले आहे आणि मला देखील ही संधी मिळू शकते”.

दरम्याने तिने उर्मिलावर केलेल्या वक्तव्यावर कंगना सारवासारव करताना दिसून आली. उर्मिलाला २०१९ साली दक्षिण मुंबईमधून लोकसभेचे तिकीट मिळाले होते. तेव्हा ती कॉँग्रेसमध्ये सहभागी झाली होती. पण नंतर तिने  शिवसेनेबरोबर हातमिळवणी केली.

Tags: kangana ranautporn starsofr porn starSunny LeoneUrmila matondkar
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Martyr surendra mogas wife emotional
Women

Video : “उठ ना यार, आय लव्ह यू रे”, शहीद पतीला अखेरचं पाहताना पत्नीचा आक्रोश, चेहऱ्यावर हात फिरवत राहिली अन्…

मे 12, 2025 | 5:42 pm
Anushka sharma on virat kohli retirement
Entertainment

“तुझे अश्रू, तुझा संघर्ष कोणीच न पाहता…”, विराट कोहलीच्या निवृत्तीवर अनुष्का शर्माची पहिली प्रतिक्रिया, भावुक झाली अन्…

मे 12, 2025 | 4:50 pm
Martyr Surendra Moga Daughter
Social

वडिलांचा शेवटचा फोन, सुरक्षित आहे बोलले अन्…; शहीद सुरेंद्र मोगा यांच्या लेकीचा आक्रोश, म्हणाली, “बदला घेईन”

मे 12, 2025 | 4:23 pm
Rakesh Poojary Death
Entertainment

अवघ्या तिशीत सुप्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, मित्राच्या मेहंदीमध्ये नाचला, मित्रांसह मस्करी केली अन्…

मे 12, 2025 | 4:05 pm
Next Post
Kushal Badrike Emotional Post Viral

"एखादं नातं तेव्हाच टिकतं जेव्हा…", कुशल बद्रिकेने शेअर केलेली पोस्ट चर्चेत, म्हणाला, "आयुष्यातून निघून गेलेली माणसं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.