शनिवार, मे 10, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

निवडणूकीच्या निकालापूर्वी कंगना रणौत देवाच्या चरणी, सतत करत आहे पूजा, पण एक चूक अन् नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला सुनावलं कारण…

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 4, 2024 | 1:39 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
kangana ranaut viral video

निवडणूकीच्या निकालापूर्वी कंगना रणौत देवाच्या चरणी, सतत करत आहे पूजा, पण एक चूक अन् नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला सुनावलं कारण…

सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. या निवडणुका पाच टप्प्यांमध्ये पार पडल्या होत्या. यामध्ये आपल्याला मनोरंजन क्षेत्रातील अनेक चेहरे अनपेक्षितपणे निवडणुकांच्या रिंगणात पाहायला मिळाले. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला देखील हिमाचल येथी मंडी या विभागातून भाजपाकडून लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळाले होते. त्यानंतर ती अनेक ठिकाणी प्रचार करतानादेखील दिसून आली. आज (४जून) निवडणुकांचा निकाल हाती येत आहे. पण अजून अंतिम निकाल येण्यास बराच कालावधी बाकी आहे. दरम्यान हाती आलेल्या आतापर्यंतच्या माहितीनुसार हिमाचल येथील मंडी येथून कंगना सुमारे ५४ हजार मतांनी आघाडीवर आहे. यासाठी ती आता देवाची पूजा करताना दिसत आहे. (kangana ranaut viral video)

निवडणुकांचा निकाल हाती येत असतानाच कंगना आघाडीवर असल्याने घरात पूजा करताना दिसत आहे. गुलाबी रंगाची साडी नेसून ती दिवा-बत्ती करताना दिसत आहे. अगरबत्ती देवाला दाखवल्यानंतर ती स्टँडमध्ये लावत आहे आणि डाव्या हाताने घंटी वाजवतानादेखील दिसत आहे. नंतर ती शेअवती हात जोडूनही देवाला नमस्कार करत आहे. पण हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी तिच्यावर टिका करण्यास सुरुवात केली. ते तिला हे सगळं कॅमेऱ्यासाठी करत असल्याचे म्हंटलं आहे. कंगनाचा हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी सांगितले की, डाव्या हाताने घंटी वाजवणे चुकीचे आहे. तसेच नक्की कोणत्या हाताने देवाची पूजा करायची हेदेखील ती विसरली.

आणखी वाचा – सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य कल्पनासमोर?, नातवंडांचं स्वप्न राहणार का अपूर्ण?

#WATCH | Himachal Pradesh: BJP candidate from Mandi and actor Kangana Ranaut offers prayers at her residence.

As per the latest ECI trends, she is leading from the seat by a margin of 30,254 votes. Counting is underway.#LokSabhaElections2024 pic.twitter.com/Bs9BTAK765

— ANI (@ANI) June 4, 2024

कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीवर दोन फोटो शेअर केले आहेत. देवीच्या मंदिराबाहेर तिची आई तिला दही साखर भरवताना दिसत आहे. त्यावर कंगनाने लिहिले की, “आईचा आशिर्वाद”, तसेच दुसऱ्या एका फोटोमध्ये तिची आई कंगनाच्या कपाळावर किस करताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिले की, “आई देवाचा अवतार आहे”.

आणखी वाचा – मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटेला दत्तगुरुंचं वेड, माणगांवमध्ये दत्तमंदिरात भजन गात असताना भाविकांचीही तुफान गर्दी, कौतुकाचा वर्षाव

कंगना मंडीमधून कॉँग्रेस नेता विक्रमादित्य सिंहच्या विरोधात उभी आहे. आता या दोघांमध्ये नक्की कोणाचा विजय होतो हे आता पाहाण्यासारखे आहे. जर ती निवडणूक जिंकली तर कायमचा बॉलिवूडला रामराम करणार असं या आधी कंगनाने स्पष्ट केले आहे.

Tags: kangana ranautloksabha election 2024mandi
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Akshay Kelkar Wedding
Entertainment

शुभमंगल सावधान! ‘बिग बॉस’ फेम सुप्रसिद्ध अभिनेता अडकला लग्नबंधनात, लग्नातील पहिला फोटो समोर

मे 9, 2025 | 6:08 pm
Aly Goni Viral Post
Entertainment

“जम्मूमध्ये माझं कुटुंब हल्ले सहन करतायत”, भारत-पाकमधील वाढत्या तणावामुळे प्रसिद्ध अभिनेता काळजीत, सांगितली सत्य परिस्थिती…

मे 9, 2025 | 5:35 pm
Pakistani Person Viral Video
Social

“त्यांना न्याय मिळाला”, पाकिस्तानी नागरिकाकडून भारतीय सैन्याचे कौतुक, पाक सैन्याला खडेबोल सुनावत…

मे 9, 2025 | 4:08 pm
Neha Kakkar Attends Driver Wedding 
Entertainment

नेहा कक्करची ड्रायव्हरच्या लग्नात उपस्थिती, नवरी मुलगी नमस्कार करण्यास खाली वाकताच घेतलं जवळ, गायिकेच्या कृतीने जिंकलं मन

मे 9, 2025 | 1:03 pm
Next Post
Lok Sabha Election Result 2024 The attention is on Kangana Ranaut, Hema Malini, Arun Govil and Ravi Kishan.

Lok Sabha Election 2024 : मंडीमधून कंगना रणौत तर मथुरामधून हेमा मालिनी आघाडीवर, अरुण गोविल यांचं काय होणार?, कोण मारणार बाजी?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.