Kajol Big Statement : बॉलिवूड अभिनेत्री काजोल हिने आजवर तिच्या ग्लॅमरसतेने आणि अभिनयाने रसिकांची मन जिंकली. काजोलचाही खूप मोठा चाहतावर्ग आहे. सध्या काजोल तिच्या आगामी ‘माँ’ या चित्रपटाचा प्रचार करण्यात व्यस्त आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान ती अनेकांशी संवाद साधताना दिसत आहेत. अशातच अभिनेत्रीने एका मुलाखतीदरम्यान केलेलं भाष्य लक्षवेधी ठरत आहे. अभिनेत्रीने देवावरील विश्वास गमावला त्या काळाला आठवले. हा काळ जवळपास एक आठवडा होता आणि हा एक अतिशय तणावपूर्ण टप्पा होता. मात्र या संकटानंतर ती डगमगून न जाता तिने स्वत: ला सांभाळले आणि कदाचित विश्वामध्ये काहीतरी वेगळंच असेल आणि तिच्या नशिबात काहीतरी वेगळे लिहिले असेल आणि म्हणून हे घडले असेल असं म्हटलं.
काजोलने ‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत देवावरील विश्वासाबाबत भाष्य केलं. यावेळी काजोलला तिने कधीही देवाच्या अस्तित्वावर किंवा असण्यावर प्रश्न उपस्थित केला आहे का?, असा सवाल केला. यावर अभिनेत्रीने क्षणाचा विलंब न करता याचं उत्तर दिलं ज्याने साऱ्यांना धक्का बसला आहे. ती म्हणाली, “हो, नक्कीच”. ती म्हणाली, “एक क्षण असाही आला ज्यावर मी सर्वाधिक विश्वास ठेवायचे मग त्या प्रार्थना,श्रद्धा असुद्या त्या सगळ्या मला निरुपयोगी वाटू लागल्या”.
अभिनेत्रीने सांगितले की हे सर्व सुमारे एक आठवडा चालले. हा अनेक प्रश्न, दु: ख आणि भावनिक तणावाचा काळ होता. ती म्हणाली, “हे काही सोप्पे नव्हते. मी खरोखर संघर्ष करीत होते. मग मला वाटले की कदाचित काही कारण असेल. कदाचित हे माझ्या मनात नव्हते. कदाचित विश्वाच्या मनात काहीतरी वेगळंच असेल”. ‘माँ’ या चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास हा चित्रपट विशाल फुरिया दिग्दर्शित आहे. या चित्रपटाचे निर्माते अजय देवगन, ज्योती देशपांडे आणि कुमार मंगत पाठक आहेत. हा पौराणिक भयपट चित्रपट २ जून २०२५ रोजी हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलगू आणि बंगाली भाषेत प्रदर्शित होणार आहे.
रामोजी फिल्म सिटीमध्ये भूत असल्याचे काजोल हिने अलीकडेच एक विधान केले. आणि त्यानंतर तिचे हे विधान वादात आले. अनेक लोक अभिनेत्रीवर रागावले आहेत. विशेषत: हैदराबादी. तिने दावा केला की अभिनेत्री प्रसिद्धीसाठी बोलत आहे, आणि हे एक बेजबाबदार विधान आहे.





