शनिवार, जून 13, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मी अगदी ठीक आहे”, अपघाताने मृत्यू झाल्याच्या अफवा पसरवणाऱ्यांवर भडकली अभिनेत्री, म्हणाली, “खोट्या बातम्या…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 9, 2025 | 1:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Kajal Aggarwal accident rumor

"मी अगदी ठीक आहे", अपघाताने मृत्यू झाल्याच्या अफवा पसरवणाऱ्यांवर भडकली अभिनेत्री, म्हणाली, "खोट्या बातम्या…"

Kajal Aggarwal accident rumor : दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवालबाबत एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली. रोड अपघातात अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. ही अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरली. यानंतर, अभिनेत्रीला स्वत: पुढे यावे लागले आणि या अफवांचे खंडन करावे लागले. काजल अग्रवाल यांनी इन्स्टाग्रामवरील मृत्यूच्या अहवालांचे अफवा असल्याचे वर्णन केले. त्यांनी लिहिले, “मला काही अफवा बातमी मिळाली आहे, असा दावा केला की माझा अपघात झाला आहे आणि मी या जगात यापुढे नाही. आणि खरं सांगायचं तर ते खूप मजेदार आहे, कारण ते खोटे आहे”.

अभिनेत्री पुढे म्हणाली, “देवाच्या कृपेने, तुम्हाला खात्री करुन घ्यायचे आहे की, मी अगदी ठीक आहे, सुरक्षित आहे आणि खूप चांगली आहे. अशा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका किंवा खोट्या बातम्या पसरवू नका अशी मी तुम्हाला विनंती करते”. ‘एनडीटीव्ही’ च्या वृत्तानुसार सोशल मीडियावर अनधिकृत अकाउंटवरून काजलचा अपघात झाल्यासंदर्भात पोस्ट करण्यात आली होती. यामध्ये तिचा अपघात झाला असून तिला गंभीर दुखापत झाल्याचं म्हटले गेले, यामुळे तिच्या जवळच्या लोकांना व चाहत्यांना अभिनेत्रीबद्दल काळजी वाटत होती. काहींनी तिच्यासाठी प्रार्थना करत पोस्ट केल्या होत्या.

आणखी वाचा – “एकटेपण मला खात होतं”, ५१ व्या वर्षी एकटेपणाला वैतागली सुप्रसिद्ध अभिनेत्री, लेकही बरोबर राहत नाही आणि…

काजलच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, तिने २००४ मध्ये ‘क्यों! हो गया ना’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तमिळ आणि तेलगू सिनेमामध्येही तिचे मोठे नाव आहे. नुकतीच तिने ‘कन्नप्पा’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

आणखी वाचा – प्रिया मराठेसह फोटो, मृत्यूची खोटी बातमी आणि…; दिशाभूल करताच मराठी अभिनेत्याचा संताप, विशाखा सुभेदारचीही कमेंट

काजल आता ‘द इंडियन स्टोरी’, ‘इंडियन 3’ आणि ‘रामायणम’ या चित्रपटात दिसणार आहे. यात रणबीर कपूर ते साई पल्लवी, सनी देओल, यश आणि रवी दुबे यासारखे अनेक कलाकार आहेत. अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, काजलने २०२० मध्ये व्यावसायिक गौतम किचलूशी लग्न केले. त्यांना नील नावाचा मुलगा आहे.

Tags: bollywood actressKajal AggarwalKajal Aggarwal accident rumor
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
Tu maza Kinara Marathi Movie

'तू माझा किनारा'चे मोशन पोस्टर समोर, कोणते कलाकार दिसणार?, उत्सुकता वाढली

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.