Jaya bachchan on Aishwarya rai bachchan : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन हे नेहमी चर्चेत असतात. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. त्यांच्या भूमिकांना प्रेक्षकांचे प्रेमही अधिक मिळाले आहे. त्यांच्या अभिनयाबरोबरच ते खासगी आयुष्यामुळेही अधिक चर्चेत राहिले आहेत. नुकताच त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय बच्चन यांच्या वेगळे होण्याच्या चर्चा सुरु झाल्या. मात्र आजवर बच्चन कुटुंबातील कोणीही यावर भाष्य केले नाही. राधिका व अनंत अंबानी यांच्या लग्नामध्ये अमिताभ, जया, अभिषेक व श्वेता बच्चन यांनी हजेरी लावली मात्र ऐश्वर्या ही मुलगी आराध्यासह वेगळी उपस्थित राहिलेली दिसली. सगळे वेगवेगळे आल्यामुळे अनेक चर्चा सुरु झाल्या.
ऐश्वर्या व अभिषेक हे २००७ साली लग्नबंधनात अडकली. लग्नानंतर काही वर्षांतच त्यांनी एका मुलीला जन्म दिला. आराध्याच्या घरात येण्यने त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आले होते. मात्र त्यानंतर काही वर्षातच त्यांच्या नात्यात कडवटपणा येऊ लागला. अशातच आता जया बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. त्यांनी अमिताभ यांनी ऐश्वर्या यांना कधीही सून मानली नसल्याचे सांगितले आहे.
जया एकदा करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी सांगितलं की, “जेव्हा श्वेताने लग्न केले तेव्हा अमिताभ यांना घर खूप शांत वाटू लागले होते. त्यांना मुलगी सतत घरात हवी होती. पण जेव्हा ऐश्वर्या लग्न करुन घरी आली तेव्हा अमिताभ यांची इच्छा पूर्ण झाली. ऐश्वर्याला त्यांनी कधीही सून म्हंटले नाही. ते नेहमी तिला मुलीसारखं वागवत असतं”.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका घटस्फोटच्या एका पोस्टला अभिषेकने लाइक केले होते. ही पोस्ट ग्रे डिव्होर्सवर आधारित होती. त्यामुळे ऐश्वर्या व अभिषेक ग्रे डिव्होर्स घेणार अशा चर्चाही अधिक रंगल्या. ग्रे डिव्होर्स म्हणजे वयाची ५० वर्ष पूर्ण झाल्यानंतर घटस्फोट घेता येतो. त्यामुळे खरच आता बच्चन कुटुंबामध्ये मिठाचा खडा पडणार का? ऐश्वर्या वेगळी होणार का? असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाले आहेत.