बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन व जया बच्चन ही जोडी अत्यंत लोकप्रिय आहे. ७० व ८० च्या दशकात या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. ‘जंजीर’, ‘अभिमान’, ‘सिलसीला’, ‘चुपके चुपके’, ‘कभी खुशी कभी गम’ अशा अनेक चिटपटांमध्ये एकत्रितपणे काम केले आहे. जया व अमिताभ यांनी ३ जून १९७३ साली लग्न केले. त्यांना अभिषेक व श्वेता अशी दोन मुलंदेखील आहेत. तसेच अभिषेक हा मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असून एक आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. अभिषेक २००७ साली अभिनेत्री ऐश्वर्या रायबरोबर लग्नबंधनात अडकला. मात्र आता त्यांच्यामध्ये दुरावा आल्याचेही समोर आले होते. (jaya bachchan on amitabh bachchan)
अभिषेकच्या बिघडलेल्या नात्याच्या चर्चा सुरु असतानाच जया यांचा अजून एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये जया यांनी त्यांच्या व अमिताभ यांच्या नाट्यावर भाष्य केले आहे. त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सिम्मी गरेवाल यांच्या शोमध्ये जय व अमिताभ यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी खासगी आयुष्यावर भाष्य केले आहे. तसेच अमिताभ यांच्याशी त्यांचे नातं कसं आहे? याबद्दलदेखील खुलासे केले आहेत.
शोमध्ये सिम्मी यांनी अमिताभ यांना प्रश्न विचारला की, “तुम्ही स्वतःला रोमॅंटिक समजता का?”, त्यावर त्यांनी उत्तर दिले की, “नाही”. तिथे बाजूला बसलेल्या जया हसल्या आणि त्यांनी सांगितले की, “माझ्याबरोबर नाही”. त्यानंतर सिम्मी यांनी विचारले की, “रोमॅंटिक होणं म्हणजे नक्की काय?”, त्यावर जया यांनी उत्तर दिले की, “तुमच्या जोडीदाराला वाईन व फुलं घेऊन येऊ शकता”. त्यावर अमिताभ यांनी जया यांना थांबवले आणि म्हणाले, “मी असं कधी केलं नाही”.
त्यानंतर जया पुढे म्हणाल्या की, “कदाचित त्यांची कोणी प्रेयसी असती तर तिच्यासाठी असं केलं असतं. पण माझ्यासाठी असं केलं नाही”. दोघांचं हे बोलणं ऐकून तिथे उपस्थित असलेले सगळेच जण हैराण झाले होते. त्यांचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. अमिताभ व रेखा यांच्या यफेअरच्या चर्चादेखील अधिक रंगल्या होत्या. मात्र दोघांनी यावर कोणतेही भाष्य केले नव्हते.