बॉलिवूडमधील ऐश्वर्या राय व अभिषेक यांच्या नात्यावर सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहेत. दोघांमध्येही वाद असल्याने लवकरच ते घटस्फोट घेऊ शकतील अशा अफवादेखील सुरु झाल्या. मात्र याबद्दल दोघांनीही अद्याप कोणत्याही प्रतिक्रिया दिल्या नाहीत. मात्र काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या, अभिषेक व आराध्या यांना दुबई एअरपोर्टवर एकत्रितपणे स्पॉट केले गेले. त्यामुळे त्यांचे नातं अजूनही व्यवस्थितपणे टिकून असल्याचे दिसून आले. अशातच आता एकेकाळी जया बच्चन व अमिताभ बच्चन यांच्यामध्येही वाद झाल्याचे समोर आले आहे. (jaya bachchan realtion with father in law)
अमिताभ व जया यांच्या एका जवळच्या मित्राने याबद्दल सांगितले. जया यांचे सासू सासऱ्यांबरोबर कसे संबंध होते? याबद्दल आता माहिती समोर आली आहे. आमिताभ यांचे मित्र अमर सिंहने जया सासू सासऱ्यांबरोबर चांगले वागत नव्हती असे सांगितले. जया व अमिताभ यांचे १९७३ साली लग्नबंधनात अडकले. जया यांनी एका मुलाखतीमध्ये हरिवंशराय बच्चन यांना त्या पसंत नसल्याचे म्हणाल्या होत्या. हरीवंशराय यांनीदेखील ‘इन द आफ्टरनुन ऑफ टाइम’मध्ये त्यांनी अमिताभ व जया यांच्या लग्नानंतर ते जया यांच्या वडिलांबरोबर नेमकं काय संभाषण झालं? हे सांगितलं आहे.
यामध्ये हरिवंश यांनी सांगितले की, “आम्ही लग्नातून बाहेर पडण्याआधी आमच्या सुनेच्या वडिलांना भेटलो. अमितसारखा जावई त्यांना मिळाल्याने मी त्यांना शुभेच्छा दिल्या. जयाबद्दलदेखील असंच काही ते बोलतील असं वाटलं होतं. पण त्यांनी सांगितलं की माझं कुटुंब पूर्णपणे उध्वस्त झाले आहे”. हे ऐकून हरिवंशराय खूप हैराण झाले होते.
त्यानंतर आठ वर्षांपूर्वी ‘दैनिक भास्कर’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अमर यांनी जया यांचे सासू सासऱ्यांच्या नात्याबद्दल धक्कादायक खुलासे केले होते. त्यांनी सांगितले की, “१५ वर्ष जया सासू-सासऱ्यांबरोबर गैरवर्तन करायच्या. अमिताभ यांच्यासमोरच हरीवंशराय व तेजी बच्चन यांचा अपमान करायच्या. पण अमिताभ काहीही बोलत नसत. नंतर जया व अमिताभ कुटुंबापासून वेगळे झाले. अमिताभ यांचे आई-वडील आजारी होते तेव्हादेखील जया यांनी त्यांचे वागणे सुधारले नाही”. अभिषेक बच्चन व श्वेता बच्चन अशी दोन मुलं आहेत.