मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडींपैकी एक जोडी म्हणजे अभिनेता रितेश देशमुख व अभिनेत्री जिनिलीया देशमुख. आपल्या दमदार अभिनयनाने व मनमोहक सौंदर्याने तिने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. रीतेश-जिनिलीया दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. दोघांची सोशल मीडियावर प्रचंड मोठी फॅन फॉलोइंगदेखील आहे. दोघे त्यांचे काही मजेशीर रील्स व्हिडीओ व ग्लॅमसर अंदाजातले फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. (Actress Genelia Deshmukh Shared Instagram Post)
अशातच जिनिलीयाने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मोठा मुलगा रीआनबरोबरचे काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोबरोबर तिने लाडक्या मुलासाठी त्याच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्टदेखील लिहिली आहे. यात तिने रिआनला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्याच्यामुळे जिनिलीयाचं आयुष्य कसं सुखदायी व आनंददायी झालं असं म्हणत तिने या पोस्टद्वारे मातृत्वतेच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
या पोस्टमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “माझ्या लेकामुळे मला एक नवीन आयुष्य मिळालं. माझा लेक… ज्याच्यामुळे माझी प्रत्येक सकाळ आणि रात्र समाधानाची आणि आनंददायी ठरते. त्याच्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे. माझ्या या मुलाशिवाय मी काहीच करू शकत नाही. मला मातृत्व देणाऱ्या माझ्या गोड मुलाला… माझ्या प्रिय रिआनला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! तू माझं प्रेम, माझं बाळ, माझा मित्र व आयुष्यभर माझा लाडका लेक असशील.”
दरम्यान, जिनिलीयाने शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अनेकांनी कमेंट्स करत रिआनला वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छाही दिल्या आहेत. त्याचबरोबर अभिनेत्री जिया शंकर, संजय कपूर, जेनिफर विगेंट, आशिष चौधरी आदि कलाकारांनीही कमेंट करत रिआनला शुभेच्छा दिल्या आहेत.