बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओल ही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेत असलेली पाहायला मिळते. २००४ साली ती ‘धूम’ या चित्रपटातून ती अधिक प्रकाशझोतात आली. त्यानंतर ती अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसून आली. २०१२ साली तिने भरत तख्तानीबरोबर लग्न केले. त्यानंतर ती अभिनयापासून दूर गेलेली पाहायला मिळाली. काही महिन्यांपूर्वीच ती तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली होती. ती आता नवऱ्याला घटस्फोट देणार असल्याचे दोघांनीही जाहीर केले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी घटस्फोट घेणार असल्याचे जाहीर केले होते. (esha deol on bad touch)
ईशाने जेव्हा घटस्फोटाचा निर्णय घेतला तेव्हा तिचे वडील धर्मेंद्र यांना तिचा निर्णय आवडला नसल्याचे सांगितले होते. मात्र आई हेमा मालीनी यांनी लेकीला पाठिंबा असल्याचे सांगितले होते. अशातच आता तिच्या आयुष्याबद्दल एक नवीन खुलासा केला आहे. तिने एकदा चुकीच्या पद्धतीचा स्पर्श सहन करावा लागल्याचे सांगितले होते. त्यामुळे तिच्या मनात एक वेगळी भीती निर्माण झाली आहे. २०१० साली ‘दस’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान हा प्रकार घडल्याचे तिने सांगितले.
ईशा ‘द मेल फेमिनिस्ट’मध्ये बोलताना या घटणेबद्दल भाष्य केले. ती म्हणाली की, “या चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळी संजय दत्त, अभिषेक बच्चन, सुनील शेट्टी व झायेद खान हे कलाकार उपस्थित होते. त्यांच्या चारही बाजूला बाऊन्सर्स होते. तरीही गर्दीतून एका व्यक्तीने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला”.
पुढे ती म्हणाली की, “मला लगेच राग येत नाही. पण सगळं काही सहनशक्तीपलीकडे गेले की मी त्यावर प्रतिक्रिया देते. अशा परिस्थितीमध्ये महिलांनी कधीही शांत बसू नये. पुरुष शारीरिक रुपात एकदम सदृढ असतो पण याचा अर्थ असा नाही की ते महिलांचा फायदा घेऊ शकतील. मला असं वाटत की महिला भावनिकरित्या खूप सशक्त असते. तसेच असे काही प्रकार घडल्यास शांत बसू नये”. दरम्या तिच्या बाबत घडलेला हा प्रकार अजूनही ती विसरू शकली नाही.