बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या खूप चर्चेत आहे. आजवर तिने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तिच्या अभिनयासह सौंदर्यालादेखील अधिक पसंती मिळते. मात्र सध्या ती कोणत्याही अभिनयामुळे किंवा सौंदर्यामुळे नाही तर आई झाल्यामुळे अधिक चर्चेत आली आहे. हे वर्ष सुरु झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या महिन्यात रणवीर व दीपिकाने आई-बाबा होणार असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केली होती. 8 सप्टेंबर रोजी तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत याची माहिती दिली. (deepika padukone on nanny)
रणवीर व दीपिकाच्या घरी चिमुकलीचे आगमन झाल्यानंतर तिला भेटण्यासाठी दिग्गज उपस्थित राहिले होते. रीलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी दीपिका व तिच्या लेकीला भेटण्यासाठी रुग्णालयात गेले होते. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर बॉलिवूडचा किंग शाहरुख खानदेखील तिला भेटण्यासाठी रुग्णालयात गेला होता. आता लवकरच ती मुलीसह घरी परतणार आहे. पण आता ती बाळाचे संगोपन कसे करणार? याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी त्यांच्या मुलांना सांभाळण्यासाठी नॅनी ठेवल्या. दीपिकादेखील तसंच करणार का? असा प्रश्न त्यांना पडला आहे. मात्र दीपिका तिच्या मुलीच्या सांगोपनासाठी आलिया भट्ट, अनुष्का शर्मा व ऐश्वर्या राय बच्चन यांच्या पालकत्व पद्धतीचा विचार करु शकते.
‘बॉलिवूडलाईफ’च्या एका अहवालानुसार, दीपिका तिच्या मुलीच्या सांगोपनासाठी ऐश्वर्याची पद्धत फॉलो करु शकते. ऐश्वर्याने आराध्याला सांभाळण्यासाठी कोणत्याही नॅनीला ठेवले नव्हते. तिने एकटीनेच मुलीचा सांभाळ केला होता. त्यामुळे दीपिकादेखील असेच करु शकते असं सांगण्यात येत आहे. तसेच अनुष्का व आलिया प्रमाणे मुलीला माध्यमांपासून दूरदेखील ठेऊ शकते. दरम्यान रणवीरचे सुरुवातीचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. यामध्ये त्याने मुलगी हवी असल्याचे अनेकदा सांगितले होते. आता त्याला मुलगी झाल्यामुळे त्याचा आनंद सध्या गगनात मावेनासा झाला आहे.