बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “या घरात तुम्ही वाईल्ड कार्ड म्हणून आला नाहीत तर…”, संग्रामच्या खेळावर रितेशची प्रतिक्रिया, म्हणाला, “अपेक्षा होती पण…”

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 14, 2024 | 12:21 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 new promo Riteish Deshmukh reacted to sangram chougule saying You are Mr. India in the house

“Bigg Boss Marathi च्या घरात तुम्ही मिस्टर इंडिया आहात”, संग्राम चौगुलेबद्दल रितेश देशमुखची प्रतिक्रिया, नवीन प्रोमो समोर

Bigg Boss Marathi 5 : यंदाच्या ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनचा आता सातवा आठवडा सुरु आहे. या सातव्या आठवड्यात घरात एका नवीन सदस्याने वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतली. सहा वेळा ‘मिस्टर इंडिया’, पाच वेळा ‘महाराष्ट्र श्री’ चा मानकरी ठरलेला संग्राम चौगुले याने बिग बॉस मराठीच्या घरात दणक्यात प्रवेश केला. ‘भाऊचा धक्का’वर शोचा होस्ट रितेश देशमुखने संग्रामचे स्वागत केले. संग्रामने ‘बिग बॉस’च्या घरात पाऊल टाकताच छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयजयकार करत एण्ट्री केली. त्याच्या एन्ट्रीनंतर घरातील समीकरणात काय बदल होतील, याकडेही प्रेक्षकांच्या नजरा खिळल्या होत्या. बुधवारी प्रसारीत झालेल्या एपिसोडमध्ये घरात कॅप्टन्सीचा टास्क रंगला होता. टास्कच्या दोन फेऱ्या पार पडल्या आणि यात ग्रुप ए ने आपला पॉवर गेम दाखवला असल्याचे दिसून आले.

वाईल्ड कार्ड एन्ट्रीनंतर संग्राम चौगुलेची चांगलीच चर्चा रंगली होती. संग्रामच्या एन्ट्रीने ‘बिग बॉस मराठी’च्या खेळाला एक वेगळाच ट्विस्ट आला. त्यानंतरच्या टास्कमध्ये संग्राम व अरबाजची जोरदार वादावादी झाल्याचीही पाहायला मिळाली. संग्रामने पहिल्याच दिवशी अरबाज व निक्कीबरोबर पंगा घेतला. त्यामुळे निक्की व अरबाजने संग्रामविरोधात मोहीमच उघडली. अशातच नुकताच एक नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यात रितेश संग्रामला त्याच्या खेळाबद्दल व घरातील वावराबद्दल सुनावत असल्याचे पाहायला मिळत आहे. या नवीन प्रोमोमध्ये रितेश संग्रामला असं म्हणत आहे की, “तुम्ही मिस्टर युनिव्हर्स आहात, पण ‘बिग बॉस’च्या घरात तुम्ही मिस्टर इंडिया आहात. तुम्ही कुठेच दिसत नाहीत. या घरात महाराष्ट्राला वाईल्ड कार्ड यावं आणि त्याने गेम पालटून टाकावा अशी अपेक्षा होती. पण या घरात तुम्ही वाईल्ड कार्ड म्हणून नाही तर माइल्ड कार्ड म्हणून आलेला आहात”.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “तुला एक संधी नक्की मिळेल पण…”, आर्याच्या ‘त्या’ कृतीवर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, “हा खेळ…”

या नवीन प्रोमोखाली प्रेक्षकांनीदेखील काही संमिश्र प्रतिक्रियांद्वारे आपली मतं व्यक्त केली आहेत. या नवीन प्रोमोखाली “संग्राम दादानी अरबाजला काही केल की लगेच तुम्ही आणि तुमची टोळी त्याला बाहेर काढणार. तुम्ही बिग बॉस नाही तर निक्कीचे गुलाम वाटता”, “खरच आहे संग्राम दादाने निराशा केलीय आमची. भिडलेच नाही कुठं”, “बर झाल ह्याला बोलले बाबा माझ्या संग्राम कडून खूप आपेक्षा होत्या. ते अरबाजची वाट लावेल म्हणून पण त्याने अरबाज ला काहीच केलं नाही”. अशा अनेक कमेंट्स करत काहींनी संग्रामच्या खेळाचे कौतुक केलं आहे, तर काहींनी त्याचा खेळ दिसला नाही असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – “Bigg Boss च निक्कीचं पायपुसणं आहे”, आर्याला शिक्षा होणार कळताच प्रेक्षक भडकले, म्हणाले, “व्हिडीओ दाखवा नाही तर…”

दरम्यान, संग्राम चौगुले हा मूळचा कोल्हापूरचा आहे. लोकप्रिय बॉडीबिल्डर म्हणून त्याने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. संग्राम फिटनेस फ्रिक असून २०१२ मध्ये त्याने ८५ किलो वजनी गटात मिस्टर युनिव्हर्सचं विजेतेपद पटकावलं होतं. तर, २०१४ मध्ये संग्रामने मिस्टर वर्ल्ड स्पर्धा जिंकली होती. त्याने एकूण सहा वेळा मिस्टर इंडिया व पाच वेळा मिस्टर महाराष्ट्र हा किताब पटकावला. संग्रामच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल सांगायचं झालं तर, तो इलेक्ट्रिकल इंजिनीअर आहे.

Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
Next Post
sharmila shinde on Shocking Video of Lalbaugcha Raja Darshan

लालबागचा राजाच्या दर्शनावेळीचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री भडकली, म्हणाली, "योग्य वागणूक दिली नाही तर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.