बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अथिया शेट्टी व के.एल. राहुल होणार आई-बाबा?, सुनिल शेट्टी यांच्या वक्तव्यानंतर सत्य समोर, टीम म्हणाली, “माझं बोलणं…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 1, 2024 | 7:19 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Athiya shetti pregnancy

अथिया शेट्टी व के.एल. राहुल होणार आई-बाबा?, सुनिल शेट्टी यांच्या वक्तव्यानंतर सत्य समोर, टीम म्हणाली, "माझं बोलणं..."

बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी ही नुकतीच खूप चर्चेत आली आहे. अभिनेते सुनील शेट्टी यांच्या नुकत्याच एका केल्या गेलेल्या विधानामुळे अथिया गरोदर असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यामुळे आता सुनील लवकरच आजोबा होणार असेही बोलण्यात येऊ लागले. पण या चर्चांना आता पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे. सुनील यांनी केलेले विधान हे गमतीशिर होते असे सूत्रांनी सांगितले असून सध्या अथिया व के.एल.राहुल आई वडील होणार नाहीत असे सांगण्यात येत आहे. (Athiya shetti pregnancy)

नुकतेच एका डान्स शो ‘डान्स दिवाने’मध्ये ‘आजी आजोबा स्पेशल’ एपिसोडदरम्यान सुनील यांनी आजोबा झाल्यानंतर कसे वागणार असे विचारल्यानंतर सुनील यांनी उत्तर दिले की, “पुढच्या पर्वामध्ये  मी आजोबा बनून मंचावर येणार”, असे सांगितले. त्यांच्या या विधानामुळे ते खरच आजोबा होणार अशा चर्चा सुरु झाल्या. पण अथिया व राहुल या दोघांनीही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.  पण ‘हिंदुस्तान टाइम्स’ च्या रिपोर्टनुसार, “अथिया सध्या गरोदर नसून या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. सुनील शेट्टी यांनी आजोबा बनण्याचे जे विधान केले ते खूपच अनौपचारिक होते. त्यांच्या बोलण्याचा सर्वांनीच चुकीचा अर्थ काढला आहे”, असे सांगितले आहे.

आणखी वाचा – Video : भर कार्यक्रमात एस एस राजामौली यांचा पत्नीबरोबर भन्नाट डान्स, उपस्थितही बघतच बसले अन्…; व्हिडीओ तुफान व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Athiya Shetty (@athiyashetty)

तसेच अंतर्गत सुत्रांनी सांगितले की, “ही एक प्रकारची मस्करी होती. सुनील यांनी मजेशीरपणे हे विधान केले होते. त्यांच्या विधानामुळे सर्वांनीच हा अर्थ कसा काय काढला? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. ही चर्चा त्यांना अजिबात करायची नव्हती. अनेकांनी पूर्ण व्हिडीओ न बघता केवळ सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल करत आहेत”.

आणखी वाचा – Video : अद्वैत-नेत्रामध्ये रोमान्स, अस्तिकाचा खरा चेहरा समोर आल्यानंतर कोणाचा मृत्यू होणार?, प्रोमोने वाढवली उत्सुकता

तसेच सूत्रांनी सांगितले की, “आथिया व राहुल हे दोघेही आपल्या वैवाहिक जीवनात खूप खुश आहेत. त्यांना आपले कुटुंब वाढवायचे आहे पण सध्या ते तयार नाहीत. सध्या तरी अथिया गरोदर असल्याच्या वृत्तामध्ये कोणतेही तथ्य नाही. जेव्हा हे खरे असेल तेव्हा मात्र याची माहिती ते स्वतः देतील. संपूर्ण कुटुंब समोर येईल आणि त्याबद्दल माहिती देईल. ही शेट्टी कुटुंबाची परंपरा आहे. त्यामुळे सुनील यांचे विधान एक मस्करी म्हणून घ्यावे”.

त्यामुळे सध्या तरी अथिया गरोदर नाही असे स्पष्ट होत आहे. तसेच लवकरच ती एखाद्या चित्रपटामध्ये दिसेल अशी अपेक्षा आहे.

Tags: athiya Shettybollywood actorbollywood actressk.l.rahulsuniel shetty
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Kartiki Gaikwad Mom To Be

"लग्नाचा कधीच विचार नव्हता पण…", गरोदरपणातील प्रवासाबाबत कार्तिकी गायकवाडचं पहिल्यांदाच भाष्य, म्हणाली, "आईचं महत्त्व कळालं जेव्हा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.