बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी हे नेहमी चर्चेत असतात .आजवर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.सुनील यांची मुलगी आथिया शेट्टीदेखील अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. काही वर्षांपूर्वी ती भारतीय क्रिकेटपटू के.एल.राहुलबरोबर लग्नबंधनात अडकली. आता लवकरच आथिया व के.एल.राहुल आई- बाबा होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यांनी सोशल मीडिया अकाउंटवर या संदर्भातील गुड न्यूज चाहत्यांना दिली आहे.तसेच सुनील लवकरच आजोबा होणार असल्याने त्यांचे चाहते अधिक उत्सुक आहेत. (athiya shetty pregnant post)
काही महिन्यांपूर्वी सुनील शेट्टी आजोबा होणार असल्याच्या बातम्या सर्वत्र पसरल्या होत्या.एका कार्यक्रमामध्ये सुनील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे गुड न्यूज असल्याचे बोलले गेले.मात्र त्यावेळी स्वतः सुनिल यांनी खुलासा करत असे नसल्याचे जाहीर केले होते.तसेच जेव्हा खरोखर आजोबा होणार तेव्हा त्याबद्दल स्वतः सांगणार असेही ते म्हणाले होते. अशातच आता आथिया व राहुल यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आमचा सुंदर आशिर्वाद लकरच येतोय 2025”.तसेच या पोस्टमध्ये बाळाची छोटी पावलंदेखील दिसून येत असून खाली आथिया व राहुल असे लिहिले आहे.
अथिया व के.एल.राहुल हे खूप महीने एकमेकांना डेट करत होते. मात्र दोघांनी कधीही हे माध्यमांसमोर कबूल केले नाही. सुनील यांनी देखील राहुल व अथियाच्या नात्याला परवानगी दिली. दरम्यान आता सुनील शेट्टी खरच आजोबा होणार यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.
दरम्यान आथियाच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर ‘हीरो’ या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. या चित्रपटात तिच्याबरोबर सूरज पांचोली दिसून आला होता. त्यानंतर ती ‘मुबारका’ व ‘मोतीचूर चकनाचूर’ या चित्रपटांमध्येही दिसून आली. लग्नानंतर मात्र ती कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. तसेच के. एल. राहुल हा भारतीय क्रिकेटसंघाचा एक उत्तर खेळाडू आहे.