रविवार, जून 14, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध अभिनेत्रीने विवाहित पुरुषाबरोबर थाटला संसार, मुलालाही जन्म न देण्याचा निर्णय अन्…; म्हणाल्या, “त्यांच्या पहिल्या पत्नीबाबत…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 8, 2024 | 12:26 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
actress aruna irani marriage

सुप्रसिद्ध अभिनेत्रीने विवाहित पुरुषाबरोबर थाटला संसार, मुलालाही जन्म न देण्याचा निर्णय अन्…; म्हणाल्या, “त्यांच्या पहिल्या पत्नीबाबत…”

भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्रींमध्ये अरुणा इराणी यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. अरुणा यांनी  १९६१ साली दिलीप कुमार यांच्या ‘गंगा जमना’ या चित्रपटामध्ये बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर त्या ‘रोटी, कपडा और मकान’, ‘रॉकी’, ‘लव्ह स्टोरी’, ‘बेटा’, या चित्रपटांमध्ये लक्षवेधी भूमिका केल्या आहेत. नुकतेच त्यांनी एका मुलाखतीमध्ये खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. तसेच त्यांनी आपल्या करिअरच्या दरम्यान दिग्दर्शक कुकू कोहली यांच्याबरोबर असणाऱ्या लव्हस्टोरी आणि लग्नाबद्दल अनेक खुलासे केले आहेत. (actress aruna irani marriage )

‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अरुणा यांनी कुकू व त्यांची लव्हस्टोरी सांगितली आहे. त्यांनी सांगितले की, “आम्ही दोघंही आधी एकमेकांचा तिरस्कार करायचो. ‘कोहराम’ या चित्रपटादरम्यान कुकूजी यांना भेटले. तेव्हा मी माझे घर चलवण्यासाठी अनेक चित्रपट करायचे. पण इतक्या चांगल्या भूमिका नव्हत्या”.

आणखी वाचा – मुंबई इंडियन्सचा पहिला विजय अन् हार्दिक पांड्यावर रागावलेले प्रेक्षक शांत, प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेबाबत स्वतःच म्हणाला, “या सामन्यात प्रेक्षकांकडून…”

View this post on Instagram

A post shared by Aruna Irani (@arunairanikohli)

पुढे त्या म्हणाल्या की, चेन्नईमध्ये मी माझ्या चित्रपटांमध्ये खूप व्यस्त होते. त्यावेळी कुकू यांनी माझ्याकडे एका महिन्याच्या डेट्स मागितल्या. मी काही दिवसांसाठी प्रयत्न केले पण हा चित्रपट करु शकत नाही असे असे त्यांना सांगितले. हे ऐकून कुकूजी नाराज झाले. पण आम्ही काम करत राहिलो. त्यामुळे माझ्याकडे जेव्हा काम नव्हते पण मला तारखा दिल्या जात होत्या. तेव्हादेखील ते मला फोन करायचे आणि मला खूप राग येत होता”.

आणखी वाचा – Video : “गुलाबी लाली आणि गाल लाल लाल…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या नवऱ्याचं ‘गुलाबी साडी’वरुन भन्नाट गाणं, हसू आवरेना, व्हिडीओ व्हायरल

पुढे त्यांनी सांगितले की, “कधी कधी मला ते पूर्ण दिवस बसवून ठेवत असत आणि केवळ एकच सीन करुन घ्यायचे. त्यामुळे आमच्यामध्ये भांडणं व्हायची. मी त्यांचा तिरस्कार करायचे तेही माझा तिरस्कार करायचे. अचानक त्यांच्यामध्ये बदल झाला. ते माझ्याशी नरमाईने बोलू लागले होते. आमच्यामध्ये मैत्री झाली. आम्ही बाहेर जाऊ लागलो आणि आमच्यामध्ये प्रेम झाले”.

तसेच यानंतर त्यांनी हे लग्न लपवल्याबद्दलही सांगितले. त्या म्हणाल्या की, “आम्ही आमच्या लग्नाबद्दल कोणालाही कळू दिले नव्हते. कारण त्यांचे एक लग्न झाले होते. मला त्यांच्या पहिल्या लग्नाबद्दल माहिती नाही अशीही बातमीदेखील त्यावेळी पसरली होती.त्यांची पत्नी मुलांबरोबर सेटवर येत असे. मला सर्व माहीत होते. माझ्यासाठी हा निर्णय घेणे खूप कठीण होते. अशाप्रकारे आमचे लग्न झाले आणि आम्ही मुलांना जन्म न देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी माझ्याशी लग्न करण्यासाठी ते संपूर्ण जगाशी लढले”.

अरुणा यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर त्या आता संजय दत्तबरोबर ‘घुडचढी’मध्ये दिसून येणार आहेत. यामध्ये त्यांच्याबरोबर रविणा टंडन, पार्थ समथान व खुशाली कुमारदेखील दिसणार आहेत.  

Tags: aruna iranibollywood actressinterviewkuku kohli
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
Nita Ambani At NMACC

Video : केसात गजरा, चंद्रकोर, पैठणी साडी अन्…; कार्यक्रमात मराठीमध्ये बोलू लागल्या नीता अंबानी, मराठमोळ्या लूकचं कौतुक, पाहा व्हिडीओ

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.