बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा खूप चर्चेत आहे. चित्रपटसृष्टीमध्ये आल्यानंतर तिने तिच्या अभिनयाने सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली आहेत. २०१७ साली ती भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीबरोबर लग्नबंधनात अडकली. इटलीमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला. घरातील व मित्रमंडळींपैकी मोजक्याच व्यक्ती या लग्नसोहळ्यासाठी उपस्थित होते. त्यानंतर २०२१ साली त्यांना पहिली मुलगी झाली. मुलीच्या जन्मानंतर मात्र ती चित्रपटसृष्टीपासून दूर झालेली पाहायला मिळाली. अशातच २०२४ साली फेब्रुवारी महिन्यात दुसरा मुलगा अकायला जन्म दिला आहे. आता अनुष्का व विराट यांनी दोन्ही मुलांना घेऊन लंडनमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चादेखील सोशल मीडियावर झाल्या. (anushka sharma at mumbai airport)
अनुष्का व विराट हे सध्या लंडनमध्ये अधिक दिसून येतात. त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. नुकतीच ती भारतात दाखल झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. तिला मुंबई एअरपोर्टवर स्पॉट केले आहे. मात्र यावेळी ती एकटी असल्याचे तिची मुलं कुठे आहेत? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अनुष्काने काळ्या रंगाचा रंगाचा आऊटफिट व काळ्या रंगाचा चश्मा लावलेला दिसून येत आहे.
एअरपोर्टवरुन बाहेर पडल्यानंतर तिने फोटोग्राफर्सना अभिवादनदेखील केले आणि नंतर कारमध्ये बसून निघून गेली. अनुष्काचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली असून अनेकांनी प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने लिहिले की, “तिसऱ्या मुलाची तयारी करत आहे त्यामुळे अनुष्का जाड दिसत आहे”.
तसेच दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की, “ही एका कार्यक्रमासाठी इथे आली आहे”, तसेच अजून एका नेटकऱ्याने लिहिले की, “पैसे कामवायला ही भारतात परत आली आहे, तिथे तर काम मिळत नसेलच”. दरम्यान यावेळी भारतात आल्यानंतर मुलं वामिका व अकाय तसेच विराटदेखील दिसले नाहीत. त्यामुळे त्यावरुनही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली आहे. सध्या ती भारतात नक्की कोणत्या कारणासाठी आली आहे? याबद्दल मात्र माहिती मिळाली नाही.