बॉलीवुड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत असते. फेब्रुवारी महिन्यात तिने लंडनमध्ये मुलाला जन्म दिला. त्यानंतर ती पुन्हा कधीही भारतात परतणार नाही असा अंदाजही चाहत्यांनी बांधला. मात्र आयपीएल दरम्यान ती एक-दोन मॅचदरम्यान ती विराटला चीयर करताना दिसली. आता सुरु असलेल्या टी२० मॅचच्या वेळीही अनुष्का विराटला चीयर करताना दिसली. यावेळचे अनुष्काचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यामुळे अनुष्काचा एक नवीन अवतार समोर आला आहे. यामध्ये अनुष्काचा राग दिसून येत आहे. हा व्हिडीओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (anushka sharma angry look)
अनुष्का नुकतीच टी २० सामन्यादरम्याने हजर होती. यावेळी मॅचच्या वेळचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये अनुष्का कोणाशी तरी रागाने बोलताना दिसत आहे. इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या व्हिडीओची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. हा व्हिडीओ समोर येताच नेटकऱ्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “वहिनी खूप रागात दिसत आहेत”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “विराट ४ रन करुन आऊट, वहिनी खूपच रागात दिसत आहेत”.
आणखी वाचा – नागराज मंजुळेंच्या ‘मटका किंग’मध्ये सई ताम्हणकरची वर्णी, महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार
तसेच काही नेटकऱ्यांनी अनुष्काचा बचावदेखील केला आहे. नेटकाऱ्याने लिहिले आहे की, “माणूस आनंदी व राग अशा दोन्ही अवस्थांमध्ये राहू शकतो. आपणही अशा दोन्ही परिस्थितितून जातो. त्यात इतकं मोठं काय आहे?”.
मॅचच्या दरम्यान अनुष्का वेगवेगळ्या मूडमध्ये असलेली दिसून आली. जेव्हा विराटने केवळ ४ धावा काढून बाद झाला त्यावेळी अनुष्का खूप नाराज झालेली दिसून आली. तसेच जेव्हा भारत जिंकला तेव्हा अनुष्का आनंद व्यक्त करतानाही दिसून आली. हा व्हिडीओदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
अनुष्काच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर आता ती भारतीय क्रिकेटर झुलन गोस्वामी यांची बायोपिक ‘छाकडा एक्सप्रेस’ या चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अनुष्का तब्बल सहा महिन्यांनी मोठ्या पडद्यावर दिसून येणार आहे. याआधी ती शाहरुख खान व कतरिना कैफबरोबर ‘झीरो’ या चित्रपटात दिसून आली होती.