रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आता तुम्हाला हिंदूही नकोत का?”, सरकारच्या ‘त्या’ निर्णयावर केतकी चितळे भडकली, कॅमेरासमोरच रडू लागली अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 13, 2024 | 2:31 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ketaki Chitale slams Maharashtra Government

"आता तुम्हाला हिंदूही नकोत का?", सरकारच्या 'त्या' निर्णयावर केतकी चितळे भडकली, कॅमेरासमोरच रडू लागली अन्…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात ७२ मंत्र्यांसह शपथ घेतली. केंद्रात वक्फ बोर्ड रद्द करण्यासंदर्भात हालचाली सुरु असताना, राज्यात मात्र युती सरकारनं ‘वक्फ’ बोर्डाच्या बळकटीकरणासाठी तब्बल दहा कोटींच्या निधीची तरतूद केल्याप्रकरणी चर्चेला उधाण आलं आहे. या चर्चांवर भाष्य करत एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा व्हिडीओ लक्ष वेधून घेत आहे. ही अभिनेत्री म्हणजे केतकी चितळे. केतकी नेहमीच सामाजिक व राजकीय मुद्यांवर आपले परखड मत मांडत असते. अशातच अभिनेत्रीने सरकारवर निशाणा साधत नोटावर शिक्कामोर्तब करणार असल्याचं म्हटलं आहे. (Ketaki Chitale slams Maharashtra Government)

हा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्री म्हणाली की, “धक्कादायक बातमी वाचून मी उठली आहे, यावर काय बोलावं काही कळत नाही आहे. ज्या लोकांनी तुम्हाला मतही दिली नाही, त्यांच्या बळकटीसाठी तुम्ही त्यांना दहा कोटी रुपये देत आहेत. तुम्ही बधीर आहात की, आम्हाला बधीर करुन सोडणार आहात?. मी नेहमीच म्हणत होते की, लोकसभेत कोणाला मत द्यायचं ते ठरलेलं आहे, त्यात काही प्रश्नच नव्हता. माझे पंतप्रधान कोण असावेत, हे बघून मी मत दिलं होतं. पण विधानसभेत कोणता झेंडा घेऊ हाती? हा प्रश्न पडणार आहे. हे मी आधीपासूनच बोलत होते. पण आता तर तुम्ही माझं मत ठाम करुन सोडलं आहे, असं केतकी या व्हिडीओत म्हणताना दिसत आहे”.

Video : वैभव मांगलेंच्या लेकाला इंग्रजी शब्द उच्चारताही येईना, स्वतःच शेअर केला व्हिडीओ, वाचन ऐकून तुम्हीही म्हणाल…

View this post on Instagram

A post shared by Ketaki Chitale (@epilepsy_warrior_queen)

पुढे ती म्हणाली आहे की, “देशभरात वक्फ बोर्ड रद्द व्हावा यासाठी मोर्चे निघत असताना, तुम्ही वक्फ बोर्डाला १० कोटी रुपये मंजूर करत आहात. आधीच तुमचं तिन तिघाडी सरकार आहे. तुम्हाला तुमच्या बाजूला आता हिंदूही नको आहेत का? एकजण पुन्हा काकांकडे जाणार आहे, काका काका माझं चुकलं मला माफ करा. दुसरी व्यक्ती काय करतेय तर, तीन चाकी सायकल चालवता येत नाही म्हणून तीन चाकी रिक्षा चालवायला जाणार आहे का?. तिसऱ्याचं तर काय राजीनामा स्विकारलाच जात नाही आहे. त्यामुळं अशा प्रकारे राजीनामा सोडा तुम्ही दरिद्रीपणा करणार आहात का?. किती संख्यानं तुमची मतं कमी करणार आहात हे तुमचं ध्येय आहे का? हा विधानसभेसाठी तुमचा निर्णय आहे का?”.

आणखी वाचा – लीलाच्या घरी पोहोचला एजे, दोघांना एकत्र आणण्यासाठी आईनेच रचला डाव, बायको म्हणून स्वीकार करणार का?

“वफ्फ बोर्डच्या बळकटीकरणासाठी पैसे देत आहात, हे नेमकं काय आहे, हे सरकारनं सांगावं. ‘वक्फ’ बोर्डानं आधीच हिंदूंची इतकी जमीन बळकावली आहे. देशात सर्वात जास्त मालिकी असणाऱ्यांपैकी वक्फ हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. यांना रद्द केलंच पाहिजे. वफ्फ बोर्डमधील माणसं आपल्या घरी आले आणि त्यांनी सांगितले की ही जमीन आमची आहे तर तुम्ही बोंबा मारत रस्त्यावर येऊ, कारण वफ्फ बोर्डचा निर्णय सुप्रीम वा हायकोर्टात चालत नाही. संघाला तोडलं आहेत आणि सनातनीही तोडत आहात”, असंही केतकी या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे. सर्व राजकारण्यांना बोल लगावत ती महाराष्ट्राचे नाव बदलण्याचा सल्ला देत आहे. अभिनेत्री या व्हिडीओमध्ये रडत आक्रोश व्यक्त करताना दिसत आहे.

Tags: ketaki chitaleKetaki Chitale slams Maharashtra Governmentmaharashtra governmentmarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Saie Tamhankar, Vijay Verma and Siddharth Jadhav will be seen in Nagraj Manjule's 'Matka King' series.

नागराज मंजुळेंच्या 'मटका किंग'मध्ये सई ताम्हणकरची वर्णी, महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.