गेल्या काही महिन्यात AI चे वापराचे प्रमाण खूप वाढले आहे. AI मुळे मोठ्या प्रमाणात फायदा होत असला तरीही मनोरंजन क्षेत्राला फटका बसत आहे. AI चा वापर वाढल्यापासून इंटरनेटवर अनेक बॉलीवूड कलाकारांचे डीपफेक व्हिडीओ तयार करण्यात आले आणि ते सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. आतापर्यंत आलिया, रश्मिका मंदना, काजोल काजळ अग्रवाल अशा अनेक अभिनेत्रींना डीपफेक व्हिडीओ तयार झाल्यामुळे समस्यांना सामोरे जावे लागले होते. अशातच आता पुन्हा एकदा आलियाचा डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा याबद्दल चर्चा सुरु झाली आहे. (alia bhatt deepfake video)
काही महिन्यांपूर्वी आलियाचा एक डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामुळे आलिया व तिचे चाहते मोठ्या प्रमाणात नाराज झालेले होते. अशातच आता पुन्हा एकदा असा व्हिडीओ समोर आल्याने त्याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली आहे. सोशल मीडियावर अनेक ट्रेंड सुरु असतात. त्यातील एक ट्रेंड म्हणजे ‘गेट रेडी विथ मी’. यामध्ये एखाद्या कार्यक्रमाला जाताना किंवा कुठेही बाहेर जाताना तयार होण्यापासून बाहेर जाईपर्यंतचा व्हिडीओ तयार करतात. असे व्हिडीओ करताना आता आलिया असल्याचे अनेकांनी म्हंटले आहे.
इन्स्टाग्रामवर समीक्षा अवतारच्या नावाच्या युजरने एक व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत तब्बल १७ मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या अकाऊंटच्या बायोमध्ये लिहिले आहे की, “AI चा वापर करुन सर्व व्हिडीओ हे केवळ मनोरंजनाच्या दृष्टीने बनवण्यात आले आहेत”. या डीपफेक व्हिडीओमध्ये आलियासारखी दिसणारी मुलगी काळ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये दिसत आहे. तसेच पूर्ण मेकअप व कॅमेरासमोर पोज देताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर AI च्या वापराबाबत चिंता दर्शवण्यात आली आहे.
आणखी वाचा – ओरी व उर्फी जावेद लग्न करणार?, स्वतःच म्हणाला, “मी लग्नाला तयार पण…”
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “ मला आधी वाटलं की ही आलिया आहे, मग मी व्यवस्थित पाहिले तर ती आलिया नाही”. दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “AI दिवसेंदिवस खूप भयंकर होत चालले आहे”. आता या डीपफेकचा वापर खूप झाल्याने समस्यांमध्येही खूप वाढ झाली आहे.