शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

महाकुंभमेळ्यामध्ये अदा शर्मा करणार लाईव्ह परफॉर्मन्स, शिवतांडव सादर करणार, अभिनेत्रीचं कौतुकास्पद काम

Shamal Sawantby Shamal Sawant
जानेवारी 13, 2025 | 1:13 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
'महाकुंभ २०२५'मध्ये अदा शर्मा सादर करणार कला

'महाकुंभ २०२५'मध्ये अदा शर्मा सादर करणार कला

बॉलिवूडमधील ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट चांगलाच गाजला.  या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री अदा शर्मा खूप चर्चेत आली. अभिनयाबरोबरच सोशल मीडियावर अधिक सक्रिय असते. तिचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना बघायला मिळतात. मात्र सध्या ती तिच्या कोणत्याची चित्रपट किंवा व्हिडीओमुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. ‘महाकुंभमेळा २०२५’मध्ये अदा सहभागी होणार आहे. याबद्दलची एक माहिती समोर आली आहे. महाकुंभ मेळा सोमवारी १३ जानेवारी पासून सुरु झाला आहे. हा मेळा २६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत असणार आहे. या कुंभमेळ्यासाठी कोट्यावधी भाविक सहभागी होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. (ada sharma perform at mahakumbh 2025)

मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी महाकुंभ मेळ्यात मनोरंजनचा आस्वाददेखील घेता येणार आहे. अमिताभ बच्चन, आलिया भट्ट, रणबीर कपूर हे कलाकार सहभागी होणार असून हरीहरन, शंकर महादेवन, मोहित चौहान, कैलाश खेर, कविता सेठ, शान, राहुल देशपांडे, महेश काळे, देवकी पंडित, शान हे गायकदेखील मेळ्याची शोभा वाढवणार आहेत. अशातच आता अदादेखील तिची कला सादर करणार असल्याची माहिती समोर येत आहे. अदा ही मोठी शिवभक्त आहे. तिला शिव तांडव स्रोत्र पूर्ण पाठ असून तिचे अनेक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर शेअर करताना बघायला मिळते.

आणखी वाचा – “कॉपी करतो”, अमिताभ बच्चन यांनीच मुकेश खन्नांचं उद्धवस्त केलं करिअर?, शक्तीमानवर नक्कल केल्याचा आरोप

View this post on Instagram

A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah)

यावेळी ती ‘महाकुंभमेळा २०२५’मध्ये शिव तांडव स्रोत्रावर परफॉर्म करताना दिसणार आहे. त्यामुळे तिचे चाहते खूपच खुश असलेले दिसून येत आहेत. तसेच तिच्या परफॉर्मन्सकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत. अदा ही शास्त्रीय नृत्यामध्ये पारंगत आहे. तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात.

आणखी वाचा – ‘ये रिश्ता…’ फेम अभिनेत्री शिवांगी जोशी व कुशल टंडनने गुपचूप केलं लग्न?, फोटो व्हायरल होताच चाहत्यांना धक्का

दरम्यान अदाच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, २००८ साली रजनीश दुग्गलच्या ‘१९२०’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिचे अनेक चित्रपटदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आले. २०२३ मध्ये आलेला ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटामुळे अधिक प्रसिद्धी मिळाली. ‘कमांडो २’, ‘हसी तो फसी’, ‘बस्तर : द नक्सल स्टोरी’ या चित्रपटांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

Tags: ada sharmalive performmahakumbh mela 2025
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Tharla tar mag fame actress Monika Dabde will become a mother soon and her baby shower ceremony done video viral

'ठरलं तर मग' फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं थाटामाटात डोहाळे जेवण, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.