बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर मनोरंजन क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. सैफच्या राहत्या घरी गुरुवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. याबद्दल अभिनेत्री, निर्माती व दिग्दर्शिका पूजा भट्टने याबद्दल ‘एक्स’वर ट्विट करत लिहिले की, “या आराजकतेवर अंकुश लावता येईल का? आम्हाला वांद्रेमध्ये अधिक पोलिस सुरक्षेची गरज आहे. मुंबईमध्ये याआधी इतकं असुरक्षित कधीच वाटलं नव्हतं”. पूजाचं हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. बॉलिवूडमध्ये अनेक कालाकरांना सुरक्षा देण्यात आली आहे. अनेकांना X,Y,Z दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. हे कलाकार कोण आहेत? ते जाणून घेऊया. (bollywood celebrity security)
काही दिवसांपूर्वी शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यामुळे सरकारने त्याला Y+ दर्जाची सुरक्षा दिली आहे. अभिनेत्याला ११ सुरक्षा कर्मचारी असून त्याच्याबरोबर ते नेहमी असतात. शाहरुख त्याच्या सुरक्षेचे स्वतः पैसेदेखील देतो.
शाहरुखच्या आधी सलमान खानलादेखील बिश्नोइ गॅंगकडून जीवे मारण्याच्या अनेक धमक्या दिल्या आहेत. दरम्याने त्याच्या घरावरदेखील गोळीबार करण्यात आला होता. या सगळ्यामध्ये सरकारने त्याला Y+ दर्जाची सुरक्षा दिली आहे.
अभिनेत्री कंगना रणौत तिच्या वादग्रस्त व्यक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असते. २०२० साली संजय राऊत यांच्याशी असलेल्या वादामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने तिला Y+ सुरक्षा दिली आहे.
गेल्या वर्षी अभिनेते अमिताभ बच्चन यांनादेखील जीवे मारण्याची धमकी मिळाली. त्यावेळी त्यांच्या सुरक्षेत वाढ करुन Y सुरक्षेवरुन X सुरक्षा दिली होती. याआधी अमिताभ यांना मुंबई पोलिसांची सामान्य सुरक्षा मिळत असे.
‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आला होता. यामुळे अभिनेते अनुपम खेर अधिक प्रकाशझोतात आले होते. यावेळी त्यांना X+ सुरक्षा मिळाली होती. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकीदेखील मिळाली होती.
अभिनेता अक्षय कुमार हा लोकप्रिय अभिनेता आहे. त्यालादेखील अनेक धमक्या मिळाल्या. त्यानंतर त्याला X+ सुरक्षा देण्यात आली होती. त्याच्याबरोबर तीन सुरक्षारक्षक नेहमी असायचे.