हिंदीवाल्यांचे मराठीत पाऊल भारी कौतुकाचे

Bollywood Actors in Marathi
Bollywood Actors in Marathi

रोहित शेट्टीचा ‘स्कूल काॅलेज आणि लाईफ’ ( त्याची बायको महाराष्ट्रीय असल्याने त्याने मराठी चित्रपटाची निर्मिती करुन ‘घरची मर्जी ‘ सांभाळली म्हणतात. एखादे नाते कोणत्या संदर्भात लावले जाईल हे सांगता येत नाही) मधुर भांडारकरचा ‘सर्किट ‘ ( आपल्या या पिक्चरच्या प्रीमियरला त्याने विशेष लक्ष ठेवले आणि वेधलेही. हिंदीतील शोमनशीप मराठीत..) या हिंदीवाल्यांच्या मराठी चित्रपट निर्मितीमुळे हिंदीतील आणखीन असेच ‘वलयांकित’ फिल्मवाले मराठीत आलेच तर आश्चर्य ते काही नाहीच. आज मराठी चित्रपटाची चहूबाजूने घौडदौड सुरु आहेच. ‘वेड’ने ही सत्तर पंचाहत्तर कोटीचा घसघशीत व्यवसाय केल्याचे त्यांनीच म्हटलयं याचाच अर्थ इतक्या अफाट यशापर्यंत मराठी चित्रपट जातोय हेच अधोरेखित होतय. (तरी कोणी म्हणते, मराठी माणूस मराठी चित्रपट पाहत नाहीत…)(Bollywood Actors in Marathi)

हिंदीवाले मराठीत याचाही एक सुखद फ्लॅशबॅक आहेच आहे. आणि त्याची त्या त्या काळात झक्कास चर्चा देखील रंगली. पाहुण्यांचे स्वागत करणे ही आपली संस्कृती आहेच आणि त्याला ‘सिनेमाचे जग’ अपवाद नाही. काही अगदी मोजकी भारी उदाहरणे देतो, वैजयंतीमाला साठच्या दशकातील हिंदीतील टाॅपची अभिनेत्री. एकाच वेळेस दिलीपकुमार, राज कपूर, देव आनंद तर झालेच पण राजेंद्रकुमार, शम्मी कपूर, धर्मेंद्र यांचीही नायिका म्हणून गाजली. तिने मराठी चित्रपटाची निर्मिती करावी यात ‘खास बात’ होती. शिवसेनेने सुरुवातीच्या काळात मुंबईतील साऊथ इंडियन्सच्या विरोधात ‘बजाव पुंगी हटाव लुंगी’ असे अतिशय जोरदार आंदोलन केले.

त्यानंतर दोनच वर्षात दक्षिण भारतीयांचे मराठीवरील प्रेम व्यक्त करण्याचा एक प्रयत्न म्हणून वैजयंतीमालाने ‘झेप’ (१९७१) या मराठी चित्रपटाची निर्मिती केली. (याचा संबंध त्या आंदोलनाशी लावला गेलाय) त्या काळातील हिंदी चित्रपटसृष्टीतील नंबर वनची तारका मराठी चित्रपटाची निर्मिती करतेय याची अगदी घोषणेपासूनच केवढी चर्चा. राजदत्त दिग्दर्शित या चित्रपटात डाॅ. काशिनाथ घाणेकर, रमेश देव, दर्शना, प्रभाकर पणशीकर इत्यादींच्या या चित्रपटात भूमिका आहेत. मुंबईत गिरगावातील मॅजेस्टीक थिएटरमध्ये ‘झेप’ प्रदर्शित झाला होता. आणि वैजयंतीमालाचा मराठी चित्रपट म्हणून कायमच गाजत राहिलाय.

हे देखील वाचा – मराठी चित्रपटात पहिल्यांदा वापरली जाणार ‘ROLLS ROYCE’ ही महागडी गाडी!अभिनेता अजिंक्य देवची पोस्ट चर्चेत

असा होता आधीचा काळ(Bollywood Actors in Marathi)

निर्माते सुधाकर बोकाडे हे हिंदीतील मोठ्ठे प्रस्थ. ‘साजन’च्या म्युझिकल हिटने त्यांच्या नावाला भारी वलय आले. हिंदीत त्यांनी चित्रपट निर्मिताचा धडाका लावताना ते मराठी चित्रपटाला अजिबात विसरले नाहीत. त्यांनी मराठीत पाऊल टाकले नसते तर आश्चर्यच होते. ते काही मराठी निर्मात्यांच्या मागे उभे राहिले. त्यांनी ‘बॅक सीट’ घेतली. आणि ‘पटली रे पटली’ ( १९९०) ची निर्मिती केली. सुधाकर बोकडे मिडिया फ्रेन्डली. आपल्या प्रत्येक चित्रपटाच्या मुहूर्त/शूटिंग/पार्टी/प्रीमियर यासाठी आवर्जून आम्हा सिनेपत्रकारांना आमंत्रित करणार. आपल्या याच वैशिष्ट्यानुसार त्यांनी अंधेरीच्या नटराज स्टुडिओत ‘पटली रे पटली’च्या सेटवर आम्हा सिनेपत्रकारांना बोलावले.

सेटवर पाऊल टाकताच दिग्दर्शक विनय लाड हा लक्ष्मीकांत बेर्डे, वर्षा उसगावकर व विजय चव्हाण यांच्यावर एक धमाल दृश्य चित्रीत करताना दिसला, पण त्याच वेळेस ‘खिडकीचा सेट’ पाहताना लक्षात आले, ‘पडोसन’ची रिमेक बनतेय. सुनील दत्त, सायरा बानू, किशोरकुमार, मेहमूद इत्यादींच्या धमाल भूमिका असलेला ‘पडोसन’ कितीही वेळा कुठूनही पहावा साॅलीड एन्जाॅय करुन फ्रेश व्हायला होते. हिंदीतील निर्माता मराठीत येताना एक मसालेदार मनोरंजक रिमेक घेऊन आला. लक्ष्या आणि वर्षाचा हुकमी ऑडियन्स असल्याने या पिक्चरला प्रेक्षक पटला.(Bollywood Actors in Marathi)

(Bollywood Actors in Marathi)

एन. चंद्रा या नावाला स्वतःची ओळख आहे. हिंदीतील त्यांचे प्रगती पुस्तक शिकाऊ संकलक म्हणून या माध्यम व व्यवसायात पाऊल टाकले यापासून सुरु होते..ते महाराष्ट्रीय. त्यांचे नाव चंद्रशेखर नार्वेकर. त्यामुळे त्यांनी मराठी चित्रपट निर्माण करावा अशी त्या काळात अपेक्षा होतीच. हिंदीमुळे त्यांच्या नावाभोवती जबरदस्त वलय निर्माण झाले होते आणि त्याच वैशिष्ट्यानुसार त्यांनी “घायाळ ” ( १९९३) चा ग्लॅमरस मुहूर्त केला.

अनिल कपूरच्या हस्ते ‘घायाळ’च्या या मुहूर्ताला उर्मिला मातोंडकरची विशेष उपस्थिती. पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित या मल्टी स्टार कास्ट चित्रपटात मधुकर तोरडमल, अशोक सराफ, अजिंक्य देव, नीना कुलकर्णी, पद्मा चव्हाण, अविनाश खर्शिकर, शिवाजी साटम अशी जबरदस्त स्टार कास्ट आणि कविता लाडचा हा पहिला चित्रपट. ‘घायाळ’ निर्मितीवस्थेत सतत चर्चेत राहिला.

हिंदीतील स्टार असो वा निर्माता, दिग्दर्शक असो, अगदी मेकअपमन असो ( अमिताभ बच्चनचे मेकअपमन दीपक सावंत यांनी ‘आक्का’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली) मराठीत त्यांचे भारी स्वागत झालयं. आणि यापुढेही ते होतच राहिल म्हणा…आणि मराठीत अनेक प्रकारचे चित्रपट पडद्यावर येत असल्याने तेवढाच वावही आहेच म्हणा. रोहित शेट्टी, मधुर भांडारकर यांच्यामुळे त्यांच्या चित्रपटांना बहुस्तरीय प्रसिद्धीही मिळालीय, आणखी हवे काय?

 – दिलीप ठाकूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Sachin PIlgoankar Fake Name
Read More

सचिनने पहिले दिग्दर्शन चक्क टोपणनावाने का बरे केले?

मनोरंजन क्षेत्रात आपल्या मूळ नावातच बदल करणे (रवि कपूरचा जितेंद्र झाला), कोणी नावात शाॅर्टफाॅर्मने आडनाव अगोदर लावणे (शांताराम…
Ashok Saraf Opposition
Read More

अशोक सराफची अशोक सराफशीच स्पर्धा झाली तेव्हा….

आपल्या एकावन्न वर्षांच्या अष्टपैलू कारकीर्दीत ‘बहुरुपी’ अशोक सराफने कळत नकळतपणे अनेक लहान मोठे विक्रम केलेत आणि हेच त्याचे…
(Poshter Boyz 2)
Read More

मराठी पिक्चरचं “थिएटर डेकोरेशन” पाह्यला जाऊ या की….

तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, एकेकाळी पब्लिकला पिक्चर पाहण्याइतकाच भारी इंटरेस्ट सिंगल स्क्रीन थिएटर्सवरचे डेकोरेशन पाहण्यातही होता, तर आजची डिजिटल…
Madhuri Dixit Tim Cook
Read More

Apple चे सीईओ टीम कूक यांना मुंबईच्या वडापावची भुरळ, धकधक गर्ल माधुरी दीक्षित सोबत घेतला वडापावचा आस्वाद..

तुम्ही आम्हीदेखील वडापाव खातोय, त्याचे हुकमी चवीचे ‘हाॅट स्पाॅट ‘ आपल्यालाही सवयीचे झालेत. जिभेला काही गरमागरम खावसं वाटलं…