शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

औक्षण, पार्टी थीम, धमाल अन्…; प्रदीप वेलणकरांच्या ७५व्या वाढदिवसाची जोरदार पार्टी, अशोक मामांसह मराठी कलाकारांची हजेरी

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑक्टोबर 20, 2023 | 7:02 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Pradeep Velankar 75th Birthday Celebration

औक्षण, पार्टी थीम, धमाल अन्…; प्रदीप वेलणकरांच्या ७५व्या वाढदिवसाची जोरदार पार्टी, अशोक मामांसह मराठी कलाकारांची हजेरी

मराठी मनोरंजनसृष्टीतील सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर यांनी अनेक नाटक, चित्रपट व मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. एअर इंडियामध्ये नोकरी करत असताना त्यांना अभिनयाची प्रचंड आवड होती. त्यामुळेच नोकरीनंतर ते अनेकदा विविध नाटक व एकांकिका करत होते. मात्र, काही काळानंतर प्रदीप यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि त्यांनी अभिनय क्षेत्रात स्वतःला पूर्णपणे झोकून घेतले. ‘बॅरिस्टर’ या नाटकामधून प्रचंड लोकप्रियता मिळाल्यानंतर त्यांनी अनेक नाटक, मालिका व चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर, हिंदी चित्रपटांमधूनही त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहे. प्रदीप वेलणकर हे गेल्या ४८ वर्षांपासून अभिनय क्षेत्रात सक्रिय असून त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांचे प्रेम मिळाले आहेत. (Pradeep Velankar 75th Birthday Celebration)

अश्या या प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्याने नुकतीच वयाची पंच्याहत्तरी पार केली आहे. प्रदीप वेलणकर यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला त्यांची पत्नी व अभिनेत्री रजनी वेलणकर, मुली मीरा व मधुरा वेलणकर, जावई अभिजित साटम व कुटुंबातील अन्य सदस्य उपस्थित होते. तसेच, ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम, अशोक सराफ, अभिनेत्री वंदना गुप्ते, ईला भाटे, चिन्मयी सुमित यांसारख्या अनेक कलाकार मंडळींनी देखील या सोहळ्याला हजेरी लावली होती. सोशल मीडियावर या सोहळ्याचे फोटोज समोर आले आहेत. ज्यामध्ये संपूर्ण कुटुंबीय या सोहळ्याचा आनंद लुटताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

हे देखील वाचा – “महाराष्ट्रात घडणारा हिंदी चित्रपट हवा”, सुप्रसिद्ध मराठी चित्रपटाच्या लेखकाची पोस्ट चर्चेत, म्हणाला, “मराठी माणंस, संस्कृती…”

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

प्रदीप वेलणकर यांनी ‘या गोजिरवाण्या घरात’, ‘असंभव’, ‘माझी तुझी रेशीमगाठ’, ‘जिवाची होतिया काहिली’ यांसारख्या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. त्याचबरोबर ‘चकवा’, ‘रॉकी’, ‘बकेट लिस्ट’ या मराठी चित्रपटांसह ‘सिंघम’, ‘पेज थ्री’ या हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. लवकरच ते ‘बटरफ्लाय’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. ज्यामध्ये ते मधुरा वेलणकरसह स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.

Tags: madhura velankarmarathi actorpradeep velankarPradeep Velankar 75th Birthday Celebration
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Humidity Infections Summer health issues
Lifestyle

आजकाल तुम्हालाही ताप आणि पोटदुखीचा त्रास होतोय का?, असे होण्यामागचं कारण आहे…

एप्रिल 18, 2026 | 9:50 am
patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Next Post
Himmanshoo Malhotra Amruta Khanvilkar

सासूने सोन्याच्या बांगड्या मागताच अमृता खानविलकरने सरळ नाही म्हणून दिलं उत्तर, म्हणालेली, “आठ लाखांची अंगठी मला हवी होती पण...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.