बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय सध्या खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने कोट्यावधी रुपयांची अलिशान कार खरेदी केली होती. कारची पूजा करतानाचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता. यामुळे विवेकचे मोठ्या प्रमाणात कौतुकदेखील झाले होते. विवेकने २००२ साली मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला होता, अभिनेत्री राणी मुखर्जीबरोबर तो या चित्रपटामध्ये दिसून आला होता. विवेक व राणी यांच्या जोडीला अधिक पसंती मिळाली होती. अशातच आता विवेकने या चित्रपटाबद्दल काही खुलासे केले आहेत. या चित्रपटाच्यावेळी त्याला मिळालेली वागणूक कशी मिळाली? हे देखील सांगितले आहे. विवेक नक्की काय म्हणाला? हे आपण आता जाणून घेऊया. (vivek oberoi on saathiya)
‘साथिया’ चित्रपटाच्या वेळच्या आठवणीबद्दल विवेक म्हणाला की, “’साथिया’ एक कमी बजेटमध्ये असणारा चित्रपट होता. त्यावेळी व्हॅनिटी व्हॅन फक्त राणीला मिळायची. मी हॉटेलच्या बाथरुममध्ये जाऊन कपडे बदलायचो. मी रस्त्यावर उभं राहून मेकअप केला आहे. मी कोण आहे? हे कोणालाही माहीत नव्हतं. मी खांद्यावर ट्रायपॉड घेऊन इतर क्रूबरोबर चालायचो”.
पुढे तो म्हणाला की, “ ‘साथिया’ चित्रपटासाठी मी सलग २२-२३ तास शूट करायचो. मी तिथेच बेंचवर पेपर टाकायचो आणि झोपायचो. एकदा आम्ही गेयटी गॅलक्सी येथील रेल्वे चॅनलच्या इथे शूट करत होतो. आम्ही शूट चालू केले. राणी प्रसिद्ध होती त्यामुळे तिच्या बरोबर एक बॉडीगार्ड असायचा. मात्र माझ्याबरोबर असं कोणी नसायचं. नंतर अचानक २००० लोक तिथे जमा झाले आणि सगळी सुरक्षा व्यर्थ ठरली”.
नंतर तो म्हणाला की, “खूप लोक जमा झाल्याने मी गोंधळलो. नंतर मला राणीच्या मेकअप व्हॅनमध्ये ढकललं. मी खिडकीतून बाहेर बघत होतो. नंतर शादने दरवाजा उघडला आणि म्हणाला की हे सगळे तुझ्यासाठी आली आहेत. तू एक मोठा स्टार आहेस”. नंतर आम्ही पुढच्या रविवारी पोलिस सिक्युरिटीबरोबरच हा सीन चित्रित केला गेला”. दरम्यान विवेकची ही मुलाखत मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.