शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

चित्रपटगृहांनंतर विक्रांत मेस्सीचा ‘द साबरमती एक्स्प्रेस’ आता ‘या’ ओटीटी माध्यमावर येणार, कधी प्रदर्शित होणार? जाणून घ्या…

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 18, 2024 | 2:55 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bollywood actor Vikrant Massey The Sabarmati Express will now air on Zee 5 OTT platform

बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सीचा ‘द साबरमती एक्स्प्रेस’ आता ‘या’ ओटीटी माध्यमावर येणार

बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सीचा चित्रपट ‘द साबरमती रिपोर्ट’ १५ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाची कथा २००२ घडलेल्या गोध्रा घटनेवर आधारित आहे. ज्यात विक्रांतने पत्रकाराची भूमिका साकारली आहे. धीर सरना दिग्दर्शित साबरमती रिपोर्टची सुरुवात काहीशी संथ गतीने होती. रिपोर्टनुसार या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ १.२५ कोटी रुपयांची कमाई केली होती. दुस-या दिवशी हा आकडा वाढून २.१० कोटी झाला. वीकेंडला चित्रपटाच्या कमाईला चांगलाच फायदा झाला. तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने ३ कोटींची कमाई केली आहे. (The Sabarmati Express Movie OTT News)

सध्या तरी या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. कुणी हा चित्रपट प्रोपगंडा चित्रपट असल्याचे म्हटलं आहे तर काहींनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटाची कथा आवडली आहे. त्यांनी खास एक्सवर पोस्ट शेअर करून चित्रपटाचे कौतुक केले आहे. दरम्यान चित्रपटगृहांमध्ये संमिश्र प्रतिसादात सुरु असलेला हा चित्रपट लवकरच ओटीटीवर येणार आहे. चित्रपटाचा ओटीटी वितरक झी स्टुडिओ आहे.

View this post on Instagram

A post shared by Vikrant Massey (@vikrantmassey)

आणखी वाचा – मौलाना सज्जाद नोमानींना भेटल्यानंतर स्वरा भास्करवर भडकले नेटकरी, संतप्त कमेंट, म्हणाले, “महिलांच्या विरोधात बोलतो आणि…”

त्यामुळे हा चित्रपट चित्रपटगृहांनंतर झी ५ वर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची तारीख आणि प्लॅटफॉर्मबद्दल अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. नियमांनुसार चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या चार आठवड्यांनंतरच चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होतो. पण जर चित्रपटाने चांगले कलेक्शन केले तर निर्माते हा कालावधी आणखी वाढवू शकतात. त्यामुळे आता साबरमती चित्रपटगृहांमध्ये किती गल्ला जमवतो हे येत्या काही दिवसांत समोर येईल.

आणखी वाचा – “तो कॅफेमध्येही काम करायचा तेव्हा…”, रेस्टॉरंट सुरु केल्यानंतर मृणाल दुसानिसला आठवले नवऱ्याचे जुने दिवस, म्हणाली, “आम्हा दोघांना…”

दरम्यान, ’12th Fail’ या चित्रपटाच्या यशानंतर विक्रांत मेस्सीने ‘द साबरमती रिपोर्ट’मध्ये ही उत्तम अभिनय केला आहे. गोध्रा घटनेवेळी नेमकं काय घडलं आणि मीडियाने ते कशा पद्धतीने दाखवलं हे या चित्रपटात दाखवले आहे. प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाबाबत बरीच चर्चा झाली होती. येत्या काळात हा चित्रपट किती कमाई करतो हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

Tags: The Sabarmati ExpressThe Sabarmati Express Movie OTT Marathi NewsThe Sabarmati Express Movie OTT News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Next Post
Shaktimaan fame actor Mukesh Khanna angry and shouting at some people video viral on social media

Video : भर मुलाखतीत मुकेश खन्ना भडकले, उपस्थितांना नको नको ते बोलले अन्…; नेटकरी म्हणाले, "जया बच्चनसारखे…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.