बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते टिकू तलसानिया यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त समोर आले. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची अवस्था नाजुक असल्याचे माहितीदेखील समोर आली. त्यांची ही बातमी ऐकून चाहते खूप चिंताग्रस्त झाले होते. टिकू यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. नुकतेच ते राजकुमार रावबरोबर ‘विकी विद्या का वो वाला व्हिडीओ’ या चित्रपटात दिसून आले होते. मात्र त्यांच्या हृदयविकाराच्या झटक्याच्या बातमीने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. अशातच आता त्यांच्याबद्दलची एक नवीन अपडेट समोर आली आहे. (tikku talsania health update)
टिकू यांची पत्नी दीप्ती तलसानिया यांनी ‘एनडिटीव्ही’शी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी टिकू यांच्या तब्येतीची अपडेट शेअर केली आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, “टिकू यांना हृदयविकाराचा झटका नाही तर ब्रेन स्ट्रोक आला होता. ते एका चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी समाविष्ट झाले होते. रात्री आठ वाजताच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना लगेचच रुग्णालयात भरती करण्यात आले”.
आणखी वाचा – टिकू तलसानिया यांना हृदयविकाराचा झटका, अभिनेते रुग्णालयात दाखल, आता प्रकृती कशी?
टिकू सध्या ७० वर्षाचे असून सध्या त्यांना मुंबईतील कोकिला बेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या ठिकाणी त्यांचे उपचार सुरु आहे. ते लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना त्यांचे चाहते करत आहेत. टिकू यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर याआधी ते ‘विकी और विद्या का वो वाला व्हिडीओ’ या चित्रपटात दिसून आले होते. यामध्ये अभिनेता राजकुमार राव व तृप्ती डिमरी यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.
‘प्यार के दो पल’, ‘ड्यूटी’, ‘असली नकली’ या चित्रपटांमध्ये दिसून आले. त्याच प्रमाणे ‘बोल राधा बोल’, कुली नंबर १’, ‘राजा हिंदुस्थानी’, ‘हीरो नंबर १’, ‘बडे मिया छोटे मिया’ ‘विरासत’ व ‘हंगामा २’ या चित्रपटांमध्येही दिसून आले. चित्रपटांबरोबरच त्यांनी अनेक मालिकांमध्येही काम केले आहे. ‘गोलमाल है भाई सब गोलमाल है’, ‘जिंदगी अभि बाकी है मेरे दोस्त’ ‘सजन रे फिर झूट मत बोलो’ या मालिकांमध्ये दिसून आले होते