सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ना दाढी ना मिशी; नव्या लूकमध्ये सनी देओलला ओळखणंही कठीण, हनुमानाच्या भूमिकेसाठी जोरदार तयारी

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 17, 2025 | 5:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
sunny deol new look

ना दाढी ना मिशी; नव्या लूकमध्ये सनी देओलला ओळखणंही कठीण, हनुमानाच्या भूमिकेसाठी जोरदार तयारी

बॉलिवूडचा एक काळ ज्या अभिनेत्याने गाजवला तो म्हणजे सनी देओल. त्याचे जुने चित्रपट आजही प्रेक्षक आवडीने पाहतात. सनीने आजवर बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्याच्या प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. एखादा चित्रपट हाती घेतला की, त्यासाठी अगदी जीव ओतून काम करायचं हा सनीचा नियमच आहे. प्रत्येक भूमिकेसाठी तो घेत असलेली मेहनत पडद्यावर दिसून येते. आताही तो त्याच्या नव्या चित्रपटाच्या जोरदार तयारीला लागला आहे. ‘बॉर्डर २’ चित्रपटाचं चित्रीकरण आता त्याने पूर्ण केलं आहे. सनी त्याच्या आगामी चित्रपटाच्या तयारीला लागला आहे. यासाठी त्याने त्याचा संपूर्ण लूकच बदलला आहे. (sunny deol new look)

सनीने सोशल मीडियाद्वारे काही नवे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्याला थोडं ओळखणंही कठीण झालं आहे. दाढी व मिशी त्याने पूर्णपणे काढून टाकली आहे. त्याचबरोबरीने त्याचं वजनही कमी झालेलं दिसत आहे. सनीने इन्स्टाग्रामद्वारे फोटो शेअर करत म्हटलं की, “नवा लूक, नवी दिशा”. डोळ्याला गॉगल लावून त्याने हटके पोझ दिल्या आहेत. सनीचा नवा लूक पाहून चाहतेही हैराण झाले आहेत.

आणखी वाचा – कॅमेरासमोर अश्लील चाळे, लिफ्टची तोडफोड आणि…; बॉलिवूड कलाकारांच्या राहत्या इमारतीत अज्ञात व्यक्ती शिरली, धक्कादायक प्रकार

View this post on Instagram

A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol)

सनी त्याच्या आगामी चित्रपटात हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यासाठी त्याने लूकमध्ये बदल केला आहे. सनी घेत असलेल्या मेहनतीचं चाहते कौतुक करत आहेत. हनुमान यांच्या भूमिकेसाठी तू लूक बदलला आहेस, जय श्रीराम, जंगलात फक्त एकच वाघ आहे आणि तो म्हणजे सनी देओल, जबरदस्त लूक त्याचबरोबर कारही एकदम मस्त, हनुमानाच्या भूमिकेची तयारी सुरु आहे का?, तुला पुढील चित्रपटात पाहण्यासाठी उत्सुक आहोत अशा विविध कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

आणखी वाचा – धर्मासाठी सोडली इंडस्ट्री, मुस्लिम मुलाशी लग्न आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्री जगतेय असं आयुष्य, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली…

‘रामायणम्’ चित्रपटाचा टीझर शेअर करत सनीने या चित्रपटाचा मीही महत्त्वाचा भाग असल्याचं म्हटलं होतं. सनीने एका मुलाखतीत हनुमानाची भूमिका साकरण्यावरुन म्हटलं होतं की, “मला या भूमिकेसाठी काम करताना भीती वाटत आहे. माझ्यासाठी हे खूप कठीण आहे”. हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘रामायणम्’चा पहिला भाग २०२६मध्ये तर दुसरा भाग २०२७मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Tags: bollywood newsentertainment newssunny deol
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
aasif khan panchayat discharged

'पंचायत'च्या जावयाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, हार्ट अटॅक आलाच नव्हता; स्वतःच केला खुलासा, म्हणाला…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.