गुरूवार, मे 15, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

स्पृहा जोशीचे कलर्स मराठीवर दमदार कमबॅक, नव्या मालिकेत ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासह झळकणार, प्रोमो व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 12, 2024 | 9:59 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Spruha Joshi New Serial

स्पृहा जोशीचे कलर्स मराठीवर दमदार कमबॅक, नव्या मालिकेत 'या' प्रसिद्ध अभिनेत्यासह झळकणार, प्रोमो व्हायरल

‘कलर्स मराठी’ वाहिनी नेहमीच प्रेक्षकांच्या जवळच्या वाहिनीपैकी एक आहे. नेहमीच ही वाहिनी आशयघन असे विषय घेऊन नवनवीन कार्यक्रम वा मालिका प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत असते. टीआरपीच्या शर्यतीतही ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील मालिका अव्वल स्थानावर असतात. अशातच एका नव्या मालिकेने ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर एंट्री केली आहे. प्रेमाची परिभाषा मांडणाऱ्या या नव्या मालिकेच्या प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कारण या मालिकेत एका लोकप्रिय व मराठमोळ्या अभिनेत्रीची एंट्री पाहायला मिळणार आहे. (Spruha Joshi New Serial)

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सुख कळले’ या मालिकेत सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री स्पृहा जोशी पाहायला मिळणार आहे. मराठी मनोरंजन विश्वातील स्पृहा ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. चित्रपट, मालिका, नाटक या तीनही क्षेत्रातून या अभिनेत्रीने प्रेक्षकांची मन जिंकली. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही स्पृहाने तिचा ठसा उमटविला आहे. तसेच स्पृहाने कवयित्री व सूत्रसंचालक म्हणूनही स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली.

आणखी वाचा – जवान विक्रम कुंभार यांच्या १० महिन्यांच्या लेकाशी जितेंद्र जोशी दोन दिवस खेळत होता अन्…; व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “बघताक्षणी त्याने…”

View this post on Instagram

A post shared by @colorsmarathi

कलर्स मराठी वाहिनीच्या ‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा स्पृहाने उत्तमरीत्या पेलवली. मात्र या कार्यक्रमाच्या मागील भागात ती दिसली नाही. त्यानंतर आता या मालिकेच्या माध्यमातून स्पृहाने मालिकाविश्वात कमबॅक केलं आहे. या मालिकेत स्पृहासह अभिनेता सागर देशमुख मुख्य भूमिकेत झळकणार आहे. याशिवाय स्पृहा व सागरबरोबर मिमी खडसे ही बालकलाकार देखील पाहायला मिळणार आहे. मालिकेच्या प्रोमोवरुन ही मालिका प्रेमाचे बंध फुलवणारी असल्याचं कळतंय.

आणखी वाचा – दिग्दर्शक सूर्य किरण यांचे निधन, वयाच्या ५१ व्या वर्षी ‘या’ गंभीर आजाराने मृत्यूला गाठलं अन्…

‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘उंच माझा झोका’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’, ‘अग्निहोत्र’ या मालिकांमधील स्पृहाची भूमिका विशेष गाजली. ‘लोकमान्य’ व ‘चंद्रविलास’ या दोन्ही मालिकांमध्ये स्पृहा व सागरची जोडी पाहायला मिळाली. मात्र टीआरपीच्या शर्यतीत या मालिका मागे राहिल्याने काही महिन्यातच ऑफ एअर झाल्या होत्या. आता पुन्हा एकदा सागर व स्पृहा एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत, ही मालिका केव्हा पाहायला मिळणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.

Tags: entertainmentmarathi actressspruha joshispruha joshi new serialsukh kalale new malika
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

navri mile hitlerla serial off air
Entertainment

झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका वर्षभरानंतर बंद होणार, कलाकार भावुक, म्हणाले, “इथली माणसं…”

मे 15, 2025 | 5:16 pm
kalki koechlin water birth
Entertainment

कल्की कोचलिनने पाण्यात मुलाला दिला जन्म, चुडैल म्हणून लोकांनी हिणवलं अन्…; ‘वॉटर बर्थ’ नक्की काय?

मे 15, 2025 | 3:43 pm
Tinnu Anand On Trolling
Entertainment

रस्त्यावरच्या कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारण्याच्या विधानावरुन टिनू आनंद यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, “कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर…”

मे 15, 2025 | 3:33 pm
Garbage Collector Passed 10th Exam
Women

पतीपासून विभक्त, लेकाचा एकटीने सांभाळ अन् …; पुण्यातील कचरा वेचणारी ‘ती’ झाली दहावी पास, प्रेरणादायी संघर्ष

मे 15, 2025 | 2:00 pm
Next Post
Saie Tamhankar Angry On Paparazi

"याचा फोन फोडू का मी…", फोटोग्राफरवर का भडकली सई ताम्हणकर?, व्हिडीओ होतोय व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.