बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर हा नेहमी चर्चेत असतो. त्याने आतापर्यंत अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने आतापर्यंत विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. बालकलाकार म्हणून त्याने अभिनय विश्वात पदार्पण केले. तो अजूनही अनेक चित्रपटांमध्ये काम करताना दिसतो. काही वर्षांपूर्वी त्याने मीरा राजपूतबरोबर लग्नबंधनात अडकला. शाहिद व मीराला दोन मुलं आहेत. त्यांच्याबरोबरचे अनेक व्हिडीओ व फोटो शाहिद सोशल मीडियावर शेअर करत असतो. पण आता तो चित्रपटामुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. (shahid kapoor and mira rajput new home)
शाहिद व मीरा यांनी मुंबईमध्ये स्वतःचे हक्काचे घर खरेदी केले आहे. या घराची किंमत कोट्यावधी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या रिपोर्टनुसार, वरळी येथील भागामध्ये असलेल्या घराचे क्षेत्रफळ ५,३९५ स्क्वेअर फुट आहे. तसेच या अपार्टमेंटमध्ये तीन पार्किंग स्पेस आहेत. हे घर त्यांनी ५८.६६ कोटी रुपयांना खरेदी केले आहे. २४ मे रोजी त्यानच्या घराची नोंदणी झाली आहे. यासाठी त्यांनी तब्बल १.७५ कोटी रुपयांची स्टॅम्प ड्यूटी भरली आहे.
रियल इस्टेटच्या रिपोर्टनुसार, ही अपार्टमेंट चंदक रियल्टीने हे ६५,००० रुपये स्क्वेअर फुट किंमतीवर खरेदी केला होता. आता याची किंमत १ लाख रुपये स्क्वेअर फुटपेक्षा अधिक किंमतीला विकला गेलं. एका वर्षामध्ये ५०% पेक्षा जास्त वाढ झालेली दिसून येत आहे.
शाहिदने मागील वर्षी डिसेंबर महिन्यात एक महागडी आलिशान कार खरेदी केली. या कारची किंमत ३.५ कोटी रुपये आहे. शाहिदचे एकूण वार्षिक उत्पन्न ३०० कोटी रुपये आहे.तसेच शाहिदच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ‘तेरी बातो मे ऐसा उलझा जिया’ या चित्रपटामध्ये दिसून आला होता. आता तो आगामी ‘देवा’ या चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे. तसेच तो जिओ स्टुडिओज व दिनेश विजन यांच्या चित्रपटांमध्येही दिसून येऊ शकतो.