प्रसिद्ध निर्माते व दिग्दर्शक बोनी कपूर यांच्याबद्दल मनोरंजन क्षेत्रामध्ये नेहमी चर्चा होत असते. त्यांनी आतापर्यंत बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली आहे. बोनी यांचे संपूर्ण कुटुंब मनोरंजन क्षेत्रात असलेले पाहायला मिळते. त्यांच्या मुली जान्हवी कपूर, खुशी कपूर तसेच भाऊ अनिल कपूर, संजय कपूर हेदेखील चित्रपटांमध्ये काम करताना दिसून आले आहेत. भाऊ अनिल हे बॉलीवूडमधील दिग्गज कलाकारांपैकी एक आहेत. त्यांनी आता पर्यंत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण संजय यांना मात्र तितके यश मिळू शकले नाही. त्याबद्दल त्यांनी नुकतेच भाष्य केले आहे. (sanjay kapoor on boney kapoor)
संजय हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते सुरिंदर कपूर यांचा मुलगा. तसेच बोनी कपूर यांचा चुलत भाऊ असतानादेखील संजय यांना तितकी प्रसिद्धी मिळाली नाही. बोनी यांनी संजय यांना १९९५ साली ‘प्रेम’ या हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून ब्रेक दिला. त्यानंतरही ते अनेक बड्या कलाकारांबरोबर काम करताना दिसले. पण भाऊ अनिल कपूर व बोनी कपूर यांच्याइतकी प्रसिद्धी मिळू शकली नाही. त्यामुळे नुकतेच त्यांनी बोनी यांच्याबद्दल भाष्य केले आहे.
संजय यांनी सांगितले की, “मी वाईट परिस्थितिमधून जात असतानादेखील बोनी यांनी मला ‘नो एंट्री’ या चित्रपटात काम दिले नाही. करियरला खूप उतरती कळा लागली होती. पण तरीही त्यांनी मला कोणताही चित्रपट ऑफर केला नाही”.
पुढे ते म्हणाले की, “जेव्हा माझ्यावर खरच वाईट वेळ होती तेव्हा माझ्या भावाने मला एकही चित्रपट दिला नाही. त्यावेळी ‘नो एंट्री’ या चित्रपटामध्ये फरदीन खान ऐवजी मला घेऊ शकले असते. या चित्रपटाच्या सुरुवातीला सलमान खान व अनिल यांना घेतले होते. त्यामुळे चित्रपटाने चांगलीच कमाई केली असती. मात्र जर फरदीनच्या जागी मी असतो तर चित्रपटाने अधिक कमाई केली असती”.तसेच त्यानंतर ते म्हणाले की, “गेल्या २० वर्षांमध्ये मी माझ्या भावाच्या प्रॉडक्शनमध्ये काम केले नाही. जेव्हा मी चित्रपटांची निर्मिती करत होतो तेव्हा माझ्यावरदेखील खूप वाईट वेळ आली होती. पण त्यावेळी त्यांनी मला घेतले नाही म्हणून ते माझ्यावर प्रेम करत नाहीत असे नाही. शेवटी हा पण एक व्यवसायच आहे”.
सध्या बोनी कपूर ‘नो एंट्री’ चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली. यामध्ये मूळ कास्ट बदलण्यात आली असून नवीन चित्रपटामध्ये वरुण धवन, दिलजित दोसांज व अर्जुन कपूर दिसणार आहेत. यावरुन अनिल कपूर यांना चित्रपटात न घेतल्याने नाराज झाल्याचे वृत्तही समोर येत होते.परंतु असे काहीही नसल्याचे बोनी यांनी स्पष्ट केले होते.