बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा नेहमीच चर्चेत असतो. मनोरंजन क्षेत्रात त्याचे अनेक चाहते आहेत. त्याच्यामुळे अनेकांचे करियरदेखील बनले आहे. जगभरात त्याचा एक वेगळा चाहतावर्ग आहे. मात्र याबरोबरच सिनेसृष्टीमध्ये त्याचे अनेक विरोधकही आहेत. विवेक ओबेरॉयबरोबर असलेले भांडण हे तर जगजाहीर आहेच. मात्र त्याने प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांच्यादेखील कानशिलात लगावली होती. अशातच आता दिवंगत अभिनेते सतीश कौशक यांच्यादेखील कानशिलात लगावल्याचे समोर आले आहे. हा प्रसंग एका सुपरहीट चित्रपटाच्या सेटवर झाला होता. (satish kaushik and salman khan slap controvrsy)
सलमानचा ‘तेरे नाम’ हा चित्रपट इतकी वर्ष उलटून गेली तरीही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या चित्रपटामुळे सलमानच्या करियरला एक वेगळी दिशा मिळाली. यामध्ये त्याच्याबरोबर भूमिका चावला ही मुख्य भूमिकेत दिसून आली होती. तसेच रवी किशनदेखील महत्तपूर्ण भूमिकेत दिसून आले होते. या कलाकारांची भूमिका असलेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप कलेक्शन केले होते. या चित्रपटाच्या यशामध्ये सतीश कौशिक यांचे मोलाचे योगदान होते. ‘तेरे नाम’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश यांनी केले असल्याचे खूप कमी लोकांना माहीत आहे.
या चित्रपटाचे जेव्हा चित्रीकरण सुरु होते तेव्हा सलमान व सतीश यांच्यामध्ये वाद झाले होते. त्यांच्यामध्ये वाद इतके वाढले की सलमानने रागाच्या भरात कानशिलात लगावली होती. मात्र याबद्दल सतीश यांनी असे कोणतेही वाद झाले नसल्याचे स्पष्ट केले होते. सलमान व सतीश यांचे चांगले नाते-संबंध चांगले असल्याने ९० दिवसांमध्ये चित्रिकरण पूर्ण केले असल्याचेदेखील ते म्हणाले.
दरम्यान सतीश हे अभिनेते असण्याबरोबरच लेखक, दिग्दर्शक, संवाद लेखकदेखील होते. त्यांनी ‘मिस्टर अँड मिसेस खिलाडी’, ‘राम लखन’, ‘साजन चले ससुराल’, दिवाना मस्ताना’, ‘हमारा दिल आपके पास है’ अशा अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ९ मार्च २०२३ रोजी वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने मनोरंजन क्षेत्रात पोकळी निर्माण झाली.