मराठी व हिंदी मनोरंजन क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तिमत्त्व बनण्यापर्यंतचा शिवचा प्रवास हा त्याच्या लोकप्रियतेचे व समर्पणाचे उदाहरण आहे. ‘बिग बॉस मराठी’ मधील त्याच्या कामगिरीने शिवला प्रसिद्धीच्या झोतात आणले. या शोमुळे तो अधिक लोकप्रिय झाला. त्यानंतर शिवने हिंदी ‘बिग बॉस’मध्ये कामगिरी केली आणि तो उपविजेता झाला. ‘झलक दिखला जा’ आणि ‘खतरों के खिलाडी’ सारख्या इतर रिॲलिटी शोमध्ये देखील त्याने उत्तम कामगिरी करत साऱ्या चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आज शिवचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. (Shiv Thakare On Bigg Boss Marathi)
सोशल मीडियावर शिव बऱ्यापैकी सक्रिय आहे. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. अशातच काही महिन्यांपूर्वी शिवने दिलेल्या एका मुलाखतीत लोकप्रिय रिॲलिटी टीव्ही शो जिंकण्याच्या आर्थिक वास्तवाबद्दल शिव ठाकरे यांचा आश्चर्यकारक खुलासा केला. ‘बिग बॉस मराठी’च्या बक्षीस रकमेतील कपातीबद्दल शिवने स्पष्टपणे भाष्य केलं आहे.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi ची विजेता रक्कम मिळवण्यासाठी सदस्यांना खेळावा लागणार मोठा टास्क, एखादी चूक घडली तर….
कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत शिवने रिॲलिटी शो जिंकण्याच्या ग्लॅमरमागील वास्तवातील अंतर्दृष्टी शेअर केली. सुरुवातीला, या शोच्या विजेत्याला २५ लाख रुपयांचे भव्य बक्षीस जाहीर करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात मिळालेली रक्कम आश्वासनापेक्षा खूपच कमी असल्याचा खुलासा त्याने दिलेल्या या मुलाखतीत केला. यावेळी बोलताना शिव असे म्हणाला की, “‘बिग बॉस मराठी’नंतर मी ‘बिग बॉस हिंदी’मध्ये आलो तेव्हा मला असं कळालं की इथे पैसे खूप मिळतात. ‘बिग बॉस मराठी’ हा शो जिंकल्यावर मला रक्कम मिळाली पण त्यातली अर्धी रक्कम ही सरकार घेते. त्यातही ३५% कापून जातात”.
आणखी वाचा – बार्बी थीम बेडरुम, प्रशस्त हॉल, आकर्षक इंटेरियर अन्…; आतून असं आहे मायरा वायकुळचं घर, पाहा Inside Video
पुढे शिव म्हणाला, “२५ लाख रुपये रक्कम होती. त्यात शेवटचे दोन स्पर्धक हरले त्यांना देण्यात त्या २५ लाखातील आठ लाख गेले. त्यानंतर उरलेली रक्कम होती ती म्हणजे १७ लाख. यापैकी माझ्या खात्यात फक्त साडे अकरा लाख आले. स्टायलिशचे कपडे, आई-बाबा विमानाने प्रवास करत शोसाठी आले या सर्वांचे पैसे कापून घेतले जातात हे मला माहित नव्हते. त्यानंतर हिंदी ‘बिग बॉस’मध्ये गेल्यावर माझं आयुष्य पूर्णतः बदललं. ब्रँडसाठी मला चांगली रक्कम मिळत गेली”.