शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : हेमा मालिनी यांच्या बर्थडे पार्टीमध्ये धर्मेंद्र यांच्या पायाजवळच बसून राहिला सलमान खान, जमीनीवरच बसला अन्…; व्हिडीओ व्हायरल

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 20, 2023 | 12:57 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Salman khan sat at dharmendra feet

Salman khan sat at dharmendra feet

बॉलिवूडमधील ७०-८० च्या दशकातील ‘ड्रिम गर्ल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री म्हणजे हेमा मालिनी. त्यांनी आपल्या अभिनयाने तर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंच पण त्यांच्या सौदर्याच्या चर्चा देखील बऱ्याच होत्या. त्या काळात हेमा मालिनी सगळ्यांच्या स्वप्नातील ‘ड्रिम गर्ल’ होत्या. आजही त्यांची सुंदरता तितकीच बरकरार आहे. नुकताच त्यांचा ७५वा वाढदिवस साजरा झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या पार्टीच आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी इंडस्ट्रीतील त्यांच्या जवळच्या सिताऱ्यांना बोलवण्यात आलं होतं. यात अभिनेत्री राणी मुखर्जी, शिल्पा शेट्टी, जया बच्चन, रेखा, अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्यासह अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती. (Salman khan sat at dharmendra feet)

या पार्टीला सलमान खानही आला होता. या पार्टीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यातील सलमान खान व धर्मेंद यांच्या फोटोंनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोत सलमान धर्मेंद्र यांच्या पायाजवळ बसलेला दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Dream Girl Hema Malini (@dreamgirlhemamalini)

आणखी वाचा – “ते कळण्याआधीच माझं…”, पहिल्या प्रेमाबाबत अक्षय कुमारचं भाष्य, म्हणाला, “पहिलं प्रेम हे…”

नेहमी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या जवळच्या व्यक्तींपैकी एक सलमान असल्याचं बोललं जातं. धर्मेंद्र सलमानला आपल्या मुलासारखे मानतात आणि त्यामुळे फोटोतील ती झलक ही पिता-पुत्राचीच आहे. सलमान एका आज्ञाधारी मुलासारखा आपल्या वडिलांसारख्या धर्मेंद्र यांच्या पायाजवळ बसून, त्यांच्याबरोबर गप्पा मारताना दिसला. माहितीनुसार सलमान धर्मेंद्र यांच्या पायाजवळ जवळजवळ १५ मिनिटं बसून होता.

आणखी वाचा – “भाड्याने घेतलेले कपडे घालते तुम्हीही…”, ज्येष्ठ अभिनेत्री जीनत अमान यांच मोठं वक्तव्य; म्हणाल्या, “मला लोनवर…”

रिपोर्ट्सनूसार, यादरम्यान धर्मेंद्रने त्याच्या तरुणपणातले बरेचसे किस्से सांगितले. यावेळी सलमान व धर्मेंद्र यांनी त्यांच्या आयुष्यातील घडामोडींबद्दल बऱ्याच गप्पा मारल्या. या सोहळ्यात सलमानने धर्मेंद्र व हेमा यांच्याबरोबर बराच वेळ घालवला.सलमान व धर्मेंद्र बऱ्याच चित्रपटात एकत्र दिसले आहेत. त्यांनी ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘टेल मी ओ खुदा’, ‘यमला पगला दीवाना’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. हेमा मालिनी यांनी या पार्टीचे बरेच फोटो व व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यातील व्हिडीओत सलमान व धर्मेंद्र एकमेकांबरोबर दिसले.  

Tags: bollywood actordharmendra feethema malini 75th birthdayon the floorsalman khan
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Leo Box Office Collection Day 1

बॉक्स ऑफिसवर थलापती विजयच्या 'लिओ'चा बोलबाला, पहिल्याच दिवशी चित्रपटाने कमावले इतके कोटी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.