साऊथचा प्रसिद्ध अभिनेता थलपती विजयचा ‘लिओ’ सिनेमा गुरुवारी प्रदर्शित झाला. धमाकेदार ऍक्शन सीन्स आणि मल्टीस्टारर कलाकारांनी भरलेल्या या सिनेमाची विजयचे चाहते बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. अखेर हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी तो बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. इतकेच नव्हे, तर सिनेमाने सर्वाधिक ओपनिंग कमाईचे रेकॉर्डस् तोडण्याबरोबर अनेक बॉलिवूड सिनेमानंही मागे टाकलं आहे. (Leo Box Office Collection Day 1)
लोकेश कनागराज दिग्दर्शित या सिनेमाच्या पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन नुकतंच समोर आलं आहे. ज्यात सिनेमाने रजनीकांतचा ‘जेलर’, शाहरुख खानच्या ‘जवान’ आणि प्रभासच्या ‘आदिपुरुष’ सिनेमांना मागे टाकत चांगली कमाई केली आहे. सॅकनिल्कने दिलेल्या माहितीनुसार, सिनेमाने जगभरात पहिल्या दिवशी तब्बल १४० कोटींची कमाई करत एक नवा रेकॉर्ड आपल्या नंबर केला. याआधी हा रेकॉर्ड शाहरुख खानच्या ‘जवान’ सिनेमाच्या नावावर होता. ज्याने पहिल्या दिवशी १२९ कोटींची कमाई केली होती. तर, भारतातील आकडेवारीचा विचार करता ‘लिओ’ने एकूण ६३ कोटींची कमाई केली आहे.
हे देखील वाचा – Bigg Boss 17 : प्रियांका चोप्राचा ‘बिग बॉस १७’मधील स्पर्धक मन्नारा चोप्राला दिला पाठिंबा, नक्की दोघींमध्ये काय आहे कनेक्शन?
#LeoHindiPoster pic.twitter.com/j380pHeHgX
— Vijay (@actorvijay) September 21, 2023
सिनेमातील ऍक्शन सीन्स व मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेचे चाहत्यांसह अनेकांनी भरभरून कौतुक आहे. त्यामुळे सिनेमाने पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई करत अनेक सिनेमांना मागे टाकलं आहे. इतकंच नव्हे, तर अनेक दक्षिणेतील राज्यामध्ये सिनेमाने सर्वाधिक ओपनिंग कमाई केली आहे. लोकेश कनागराज आणि विजयचा हा दुसरा सिनेमा असून यात संजय दत्त, त्रिशा, अर्जुन सरजा, गौतम वासुदेव मेनन, प्रिया आनंद आदींनी प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट मूळ तमिळसह चार भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.