मंगळवार, मे 13, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध अभिनेत्रीने प्रेम, लग्नासाठी बदलला धर्म, इंडस्ट्रीही सोडली अन्…; आता ओळखणंही झालं कठीण

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 5, 2024 | 4:17 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bollywood actress ayesha takia

सुप्रसिद्ध अभिनेत्रीने प्रेम, लग्नासाठी बदलला धर्म, इंडस्ट्रीही सोडली अन्...; आता ओळखणंही झालं कठीण

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींनी मोठ-मोठ्या अभिनेत्यांबरोबर चित्रपटांमध्ये काम करून नाव कमावले आहे. काही अभिनेत्री टिकल्या तर काहींनी बॉलिवूडला कायमचा रामराम केला. त्यातील एक अभिनेत्री म्हणजे आयेशा टाकिया. आयेशाने बॉलिवूडमधील अजय देवगण, अनिल कपूर, नागार्जुन, शाहिद कपूर अशा आघाडीच्या अभिनेत्यांबरोबर चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. परंतु सध्या ती चित्रपटसृष्टीपासून दूर असलेली पाहायला मिळत आहे. नुकतीच ती तिच्या लूकमुळे प्रचंड व्हायरल झाली होती. पण तिने अभिनय का सोडला?, सध्या ती काय करते? हे जाणून घेऊया. (Bollywood actress ayesha takia)

आयेशाने २००० साली १४व्या वर्षी फाल्गुनी पाठकच्या ‘मेरी चुनर उड उड जाये’ या म्युजिक व्हिडीओमधून तिला अधिक ओळख मिळाली. त्यानंतर २००४ मध्ये ती ‘टार्जन:द वंडर कार’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ‘सोचा ना था’, ‘सलाम ए इश्क’,‘वॉन्टेड’ व ‘पाठशाला’ यामध्येही ती दिसली होती. मुख्यतः ती सलमानबरोबर ‘वॉन्टेड’ मधून अधिक प्रकाशझोतात आली. २००९ मध्ये आलेला हा चित्रपट  वर्षातील अधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.पण त्यानंतर आयेशाने चित्रपटसृष्टीला कायमचा रामराम केला. २००९ मध्ये तिने तिचा प्रियकर फरहान आजमीबरोबर लग्न केले. त्यावेळी तिचं वय २३ वर्षे होतं.

आणखी वाचा – “ज्याच्या हातात जास्त पैसा…”, मनीषा राणीने ‘झलक दिखला जा ११’चं विजेतेपद पटकावल्यानंतर शिव ठाकरेचं भाष्य, अभिनेत्यावरच भडकले प्रेक्षक

View this post on Instagram

A post shared by ????Ayesha Takia Azmi (@ayeshatakia)

आयेशाचा पती फरहान आजमी हा समाजवादी पार्टीचे नेते अबू आजमी यांचा मुलगा आहे. तसेच तो एका रेस्टॉरंटचा मालक आहे. लग्नानंतर तिने इस्लाम धर्म स्वीकारला. दोघांनाही एक मुलगा आहे. सध्या ती गोव्यामध्ये राहत असून पतीच्या व्यववसायात मदत करत आहे.

आणखी वाचा – “माझ्या वागण्यामुळे सगळे पक्ष संपतील”, राजकारणात प्रवेश करण्यावरुन नाना पाटेकरांचं बेधडक वक्तव्य, म्हणाले, “अमर असल्यासारखे वागतात आणि…”

काही दिवसांपूर्वीच आयेशा तिच्या लूकमुळे अधिक चर्चेत आली होती. प्लास्टिक सर्जरी केल्यामुळे तिचा चेहरा भरपूर बदलला आहे. तिला ओळखणेदेखील कठीण झाले आहे. ती नुकतीच मुंबई एअरपोर्टवर दिसून आली होती तेव्हा तिचा चेहरा सुजलेला दिसून आलं. तसेच तिचे वजनही वाढलेले दिसले. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यावर अनेक नकारात्मक प्रतिक्रिया आल्या होत्या. या प्रतिक्रियांना तिने चोख उत्तरही दिले होते.    

Tags: Ayesha Takiabollywood actresshindi actresshindi movietarzen: the wonder carwanted actress
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Shiny Doshi Shocking Revelation
Entertainment

“तू धंदा करायला जातेस का?”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीला वडीलांकडूनच घाणेरडी वागणूक, आईलाही लाथा-बुक्क्यांनी मारायचे तेव्हा…

मे 12, 2025 | 7:00 pm
handicap couple love story
Social

Video : अपघातात गमावले दोन्ही हात, तरीही गर्लफ्रेंडने केलं लग्न; सात वर्षांच्या प्रेमाला घरातून विरोध असताना…

मे 12, 2025 | 6:33 pm
Kokan Hearted Girl Video
Social

कोकणची माणसं खरंच साधीभोळी; अंकिता वालावलकरने जास्वंद विकणाऱ्या काकांचं शूट करत पटवून दिलं, पैशांचा विचार न करता…

मे 12, 2025 | 5:56 pm
Martyr surendra mogas wife emotional
Women

Video : “उठ ना यार, आय लव्ह यू रे”, शहीद पतीला अखेरचं पाहताना पत्नीचा आक्रोश, चेहऱ्यावर हात फिरवत राहिली अन्…

मे 12, 2025 | 5:42 pm
Next Post
Abhay Deol Viral Post

"माझी अशी इच्छा आहे की…", देओल कुटुंबातील सुप्रसिद्ध अभिनेता स्वतःलाच म्हणत आहे पॉर्नस्टार, म्हणाला, "मी स्वतः एक…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.