बॉलिवूडमधील नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री मलायका अरोरा सध्या खूप चर्चेत आहे. तिच्या वाडिलांनि राहत्या इमारतीच्या छतावरुन उडी मारुन आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. हे ऐकताच मलायकाच्या पायाखालची जमीन सरकली. यावेळी तिचा पूर्वाश्रमीचा पती अरबाज खानदेखील उपस्थित होता. तसेच त्याचवेळी अरबाजचे आई-वडील, बहिणीदेखील मालायकाला धीर देण्यासाठी उपस्थित राहिले होते. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. तसेच अरबाजची पत्नी शुरा खानदेखील पोहोचली होती. (salman khan absent on malayka arora father funeral)
मलायकाच्या वडिलांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. पोलिस आता पुढील तपास करत आहेत. आज तिच्या वाडिलांवर अंत्यसंस्कार होणार आहेत. गुरुवारी मुंबईतील सांताक्रुझ येथील हिंदू स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या ठिकाणी इंडस्ट्रीमधील मलायकाचे जवळचे मित्र तसेच खान कुटुंबीय उपस्थित राहिले. मात्र या सगळ्यात अभिनेता सलमान खान कुठेही दिसून आला नाही. याबद्दल आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली.कदाचित सलमान मुंबईमध्ये नसेल त्यामुळे तो उपस्थित राहू शकला नाही अशी शक्यता वर्तवली जात आहे.
आणखी वाचा – मलायकाच्या वडिलांवर आज अंत्यसंस्कार, शेवटचं पाहण्यासाठी बॉलिवूडकरांची गर्दी, अश्रू अनावर
दरम्यान अभिनेत्री रश्मिका मंदनाच्या स्टोरीकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. सध्या सलमान त्याचा आगामी चित्रपट ‘सिकंदर’च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. यामध्ये रश्मिका व सलमान यांची जोडी पाहायला मिळणार आहे. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त झाल्याचे समजून येत आहे. तसेच यामध्ये तिने फुल दिसत असून एक नोटदेखील दिसत आहे. कॅप्शनमध्ये “दिवस पहिला” व हॅशटॅगमध्ये ‘सिकंदर’ असे लिहिले आहे. यामुळे सलमान मलायकाच्या दु:खात सहभागी होऊ शकला नाही.
आणखी वाचा – कपिल शर्माच्या ‘द ग्रेट इंडियन…’शोची दुसऱ्या पर्वाची तारीख समोर, काय खास असणार?
मलायकाच्या वडिलांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी आज अरबाज खान, त्याची पत्नी शूरा, अर्जुन कपूर, फराह खान, करीना कपूर, सैफ अली खान, करिश्मा कपूर, जिनिलीया-रितेश, सोहेल खान, गौहर खान, गीता कपूर, मोहित मारवाह, टेरेंस, अर्शद वारसी, गुरू रंधावा, मिनी माथूर, पुनित मल्होत्रा, किम शर्मा असे सगळे कलाकार मलायका व तिच्या कुटुंबीयांना धीर देण्यासाठी पोहोचले आहेत.