‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वात स्पर्धक मंडळी तुफान राडे करताना दिसत आहेत. भांडणं, वाद विवाद, हाणामारी यामुळे हा शो नेहमीच चर्चेत असतो. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनची प्रेक्षकांमध्ये चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. यंदाच्या या नव्या पर्वात अनेक कलाकार उत्तम खेळताना दिसत आहेत तर काहीजणांना हा खेळ सोडावा लागला आहे. सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, अरबाज पटेल, वैभव चव्हाण, आर्या जाधव, धनंजय पोवार, वर्षा उसगांवकर, पॅडी कांबळे, अंकिता वालावलकर या स्पर्धकांना ‘बिग बॉस’च्या घरात धुमाकूळ घालताना पाहणं रंजक ठरत आहे. (Bigg Boss Marathi Season 5)
एकामागोमाग एक आलेले टास्क स्पर्धक तितक्याच हुरहुरीने करताना दिसतात. बरेचदा या टास्कदरम्यान स्पर्धकांमध्ये मारामारी ही झालेली पाहायला मिळाली. अशातच ‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धकांना एक नवा टास्क दिला आहे. घराचा नवा कॅप्टन निवडण्यासाठी एक नवा टास्क देण्यात येतो. या टास्कमध्ये आर्या व निक्की यांच्यात मारामारी झालेली पाहायला मिळाली. समोर आलेल्या नव्या प्रोमोमध्ये आर्याने निक्कीला मारलं असल्याचं सांगितलं.
आणखी वाचा – मलायकाच्या वडिलांच्या अंतिम संस्काराला सलमान खान गैरहजर, अनुपस्थितीचं कारण समोर
प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, “आता वेळ आहे नवा कॅप्टन निवडण्याची”, असं ‘बिग बॉस’ घरातील सर्व सदस्यांना सांगतात. त्यानुसार सगळेच स्पर्धक खेळाला सुरुवात होते. जान्हवी ‘बिग बॉस’ यांनी टास्कनुसार दिलेल्या डायमंडचे संरक्षण करत असते. त्यावेळी आर्याही जान्हवीला मदत करत त्या डायमंडचा बचाव करत असते. तेव्हा निक्की त्यांना अडचण निर्माण करत असते तेव्हा आर्या निक्कीशी लढताना दिसते. दोघींमध्ये हातापाया होते आणि निक्की रडत बाहेर जाते.
आणखी वाचा – मलायकाच्या वडिलांवर आज अंत्यसंस्कार, शेवटचं पाहण्यासाठी बॉलिवूडकरांची गर्दी, अश्रू अनावर
निक्की ‘बिग बॉस’ला म्हणते, “‘बिग बॉस’ हिने मला मारलं आहे. आणि हे मी सहन करुन घेणार नाही”. तर इकडे आर्या ही स्वतःची चूक नसल्याचे सांगत, “त्या गोष्टीच मला काही लेनदेन नाही. होउदे काय ते. गेली तर गेली घरी”, असं म्हणते. तर इकडे निक्की म्हणते, “‘बिग बॉस’ हिला घराच्या बाहेर काढा नाहीतर मला काढा”, असं बोलत रडताना दिसते.