टेलिव्हीजनवरील कॉमेडी कार्यक्रम कपिल शर्मा शो हा चांगलाच चर्चेत आला आहे. अनेक वर्ष या कार्यक्रमाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. टेलिव्हीजनवरुन हा कार्यक्रम आता बंद करुन कपिलचाच एक नवीन कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा नवीन शो म्हणजे ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’. काही महिन्यांपूर्वी या शोचं पहिलं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. दोन महीने झाल्यानंतर या शोने प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण या कार्यक्रमाने लवकर निरोप घेतल्याने प्रेक्षक चांगलेच नाराज झाले होते. (the great indian kapil show)
‘कपिल शर्मा…’ मध्ये कपिल शर्मा, अर्चना पूर्ण सिंह, सुनील ग्रोव्हर, किकू शारदा, कृष्णा अभिषेक, राजीव ठाकूर असे कलाकार दिसून आले होते. आता पुन्हा एकदा नवीन पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कपिलने एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये संपूर्ण टीम धमाल करताना दिसत आहे. तसेच नवीन शो कधी येणार याबद्दलदेखील चर्चा करताना दिसत आहेत.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये त्यांनी एक या कार्यक्रमाची तारीख सांगितले. त्यांनी लिहिले कि, “हसून हसून तुम्ही वेडे होणार आहात. आता शनिवार होणार फनिवार. आम्ही येत आहोत 21 फप्टेंबरपासून तुमच्या भेटीला”. हा शो तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
याआधीच्या पर्वामध्ये दिलजित दोसांज, नितू कपूर, परिणीती चोप्रा, रणबीर कपूर, विक्की कौशल, सनी कौशल, आमीर खान हे दिग्गज कलाकार उपस्थित राहिले होते. या सगळ्यांबरोबर कपिलने खूप धमाल केली होती.आता या कार्यक्रमाचा दुसरा भाग प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. त्याचे चाहतेदेखील याची खूप वाट बघत आहेत. काही दिवसांपूर्वी अर्चनाने दुसऱ्या पर्वाचे चित्रीकरण सुरु असल्याची पोस्ट केली होती. तसेच नवीन सीजनसाठी खूप उत्सुक असल्याचेही तिने पोस्टमध्ये म्हंटले होते. त्यामुळे आता लवकरच सगळे हसणार आहेत.