Navri Mile Hitlarla Promo : ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहेत. एजे आणि लीलाची अनोखी लव्हस्टोरी मालिकेत सुरु आहे. अखेर एजे लीलाच्या प्रेमात पडले आहेत. तर लीला व एजे एकत्र येऊ नयेत म्हणून त्यांच्या तीनही सूना सरस्वती, दुर्गा आणि लक्ष्मी अथक प्रयत्न करताना दिसत आहेत. अनेकदा एजेसमोर लीला चुकीची ठरावी म्हणून त्या कुरघोडी कराताना दिसत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून एजेचे लीलाबद्दलचे मत बदलल्याचे दिसत आहे. अशातच मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये एजे व लीला यांच्यातील प्रेम पाहायला मिळत आहे. एजेंना लीलाबद्दल वाटणारी काळजी या प्रोमोमध्ये स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. लीलाचा क्युट अंदाज एजेला भावला असून त्यांच्या तीनही सूनांचा डाव फसला असल्याचं समोर आला आहे.
‘झी मराठी’ वाहिनीच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन मालिकेचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, एजेने घरी नवीन वर्षाची पार्टी ठेवलेली असते. या पार्टीत सर्वांनी सुंदर आणि हटके पोशाखात हजेरी लावायची असते. त्यावेळी घरातील सर्व मंडळी तयार होऊन हॉलमध्ये जमतात. तर इतर सदस्य लीला येण्याची वाट पाहत असतात. लीला येताच तिचा अवतार पाहून सगळेच तिच्यावर हसतात. साधी साडी, एक घट्ट वेणी, वेणीला लाल रिबन आणि त्यात ती वेणी वाकडी असल्याने हा लूक पाहून सगळे तिची मस्करी करतात.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं थाटामाटात केळवण, होणाऱ्या नवऱ्यासह जेवणावर मारला ताव, फोटो व्हायरल
लक्ष्मी लीलाला विचारते की, “तुम्ही अशा अवतारात का आल्या आहात?”. तर सरस्वती म्हणते, “ती शेंडी तर?…”, असे म्हणत ती हसते. लीलाची फजिती होताच ती रडत तिच्या रुममध्ये जाते. एजेदेखील तिला समजावण्यासाठी तिच्या पाठोपाठ जातात. तेव्हा लीला एजेंना घट्ट अशी मिठी मारून रडते. ती रडत रडत एजेंना म्हणते, “कशीये मी एजे? धांदरट, सतत गोंधळ घालणारी, बघा ना काय अवतार करुन आलीय मी”.
आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’ मधील सायलीचं माहेरचं घर तुम्ही पाहिलंत का?, कॅमेऱ्यामागे नक्की कशी असते परिस्थिती?
यावर एजे मात्र लीलाची समजूत काढतात. एजे म्हणतात, “तू या लूकमध्येसुद्धा किती क्यूट दिसतेस”. त्यानंतर एजे लीलाचा हात धरुन तिला पार्टीत घेऊन जातात. पार्टीत लीलाला बरं वाटावं, वेगळं वाटू नये म्हणून एजेदेखील वेगळा लूक करुन येतात. इतकंच नाही तर ते लीलासाठी डान्स करताना दिसत आहेत. एजेचा हा अंदाज पाहून, त्याच्या सूना देखील अवाक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता मालिकेत पुढे काय होणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.