Bollywood Actor Saif Ali Khan Attacked : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर गुरुवारी पहाटे झालेल्या हल्ल्याने अवघ्या मनोरंजन सृष्टीत खळबळ उडाली आहे. त्याच्या अनेक चाहत्यांनीसुद्धा या प्रकरणी दुःख व काळजी व्यक्त केली आहे. दिवसभर त्याच्याबद्दलचे अनेक वृत्त समोर येत असतानाच आता पत्नी करीना कपूरने संपुर्ण घटनेबद्दल तिची पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत तिने पापाराझी व माध्यमांना विनंती केली आहे. तसंच तिने हितचिंतकांचे आभारही मानले आहेत यमी या कठीण काळात कपूर कुटुंबियांना समजून घेण्याची व त्यांच्या गोपनीयतेचा व सीमांचा अंदर करण्याची विनंतीही तिने पोस्टमधून केली आहे. करीनानं या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं आहे? (Kareena Kapoor on Saif Ali Khan attack)
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये करीना कपूरने असं म्हटलं आहे की, “आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आमच्या कुटुंबासाठी हा एक आव्हानात्मक दिवस होता आणि आम्ही अजूनही जे काही घडलं ते पचवण्याचा प्रयत्न करत आहोत. या कठीण काळातून जात असताना, मी आदरपूर्वक आणि नम्रपणे विनंती करते की, मीडिया आणि पापाराझींनी सातत्याने अंदाज बांधणे आणि कव्हरेज करणे टाळावे. तुम्ही दाखवत असलेल्या काळजीबद्दल व तुम्ही देत असलेल्या पाठिंब्याबद्दल आम्हाला कौतुक आहे. पण सतत केली जाणारी तपासणी आणि ठेवले जाणारे लक्ष आमच्या सुरक्षितेसाठी मोठा धोकाही निर्माण करु शकतो.”.
यापुढे तिने म्हटलं की, “त्यामुळे सर्वांना एक विनंती आहे की कृपया आमच्या सीमांचा आदर करावा. कुटुंब म्हणून यातून बरे होण्यासाठी आणि याचा सामना करण्यासाठी आम्हाला काही वेळ द्यावा. आमच्या या संवेदनशील काळात तुम्ही देत असलेल्या सहकार्याबद्दल मी तुमचे आभार मानू इच्छिते”. करीनाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी तिच्या या पोस्टवर तिला खंबीर राहण्यास सांगितले आहे. तसेच काळजी व चिंता न करण्याचे आवाहनही केले आहे.
आणखी वाचा – 17 January Horoscope : मेष, सिंह, धनु व कुंभ राशीच्या लोकांसाठी शुक्रवारचा दिवस भाग्याचा, जाणून घ्या…
दरम्यान, काल (गुरुवार १६ जानेवारी) रोजी करिनाच्या टीम कडून एक निवेदन जारी करण्यात आले होते. ज्यात सैफ अली खामवर सध्या उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले होते. काही शस्त्रक्रियानंतर आता सैफवरील धोका टळला आहे. तसंच या प्रकरणी एक व्यक्ती ही पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.