शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

घटस्फोटाच्या २० वर्षांनी सैफ अली खानची पहिली बायको करणार दुसरं लग्न?, म्हणालेल्या, “कधी काय होईल…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 5, 2024 | 4:34 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
amrita singh on second marriage

घटस्फोटाच्या २० वर्षांनी सैफ अली खानची पहिली बायको करणार दुसरं लग्न?, म्हणालेल्या, "कधी काय होईल..."

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान हा नेहमी चर्चेत असतो. त्याने आजवर अनेक हिंदी चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. १९९१ साली तो अभिनेत्री अमृता सिंहबरोबर लग्नबंधनात अडकला. मात्र काही वर्षातच म्हणजे २००४ साली दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्यांची मुलं सारा व इब्राहिम दोघंही  आईकडे म्हणजे अमृताकडे राहू लागले. आता सारा ही बॉलीवूडमध्ये चित्रपटांमध्ये काम करताना दिसते. दोघांच्याही घटस्फोटाला २० वर्ष झाली आहे. या २० वर्षांमध्ये सैफ व अमृता अनेकदा कार्यक्रमांमध्ये एकत्रित दिसून आले आहेत. आता नुकताच अमृता यांनी घटस्फोटाच्या इतक्या वर्षानंतर त्यामागील कारण सांगितलं आहे. (amrita singh on second marriage)

सैफने २०१२ साली करीना कपूरबरोबर लग्न केले. दोघांना तैमुर व जेह अशी दोन मुलं आहेत. मात्र सारा व इब्राहिम यांच्याबरोबरदेखील खास बॉंड आहे. अशातच आता अमृताने दुसरं लग्न करण्याबद्दल भाष्य केले आहे. अमृता यांनी नुकताच पूजा बेदीला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्वतःच्या खासगी आयुष्यावर भाष्य केले. अमृता म्हणाल्या की, “मला भाविष्यात लग्न करायचे नाही. पण कधी काय होईल हे सांगता येत नाही. मी काय आता १६ वर्षाची मुलगी नाही आहे. पण पुन्हा मी लग्न करणार नाही”.

आणखी वाचा – अधिपती व अक्षराच्या नात्यात फुट पाडणार गाणं शिकवणारी मास्तरीणबाई?, भुनवेश्वरीसह रचणार नवं कटकारस्थान, परत घरात येणार का?

View this post on Instagram

A post shared by Amrita Singh (@amrita40_)

पुढे त्या म्हणाल्या की, “तुम्ही भविष्याबद्दल काहीही सांगू शकत नाही. खर तर माझ्याकडे ते सर्व आहे जे मला एखादा पुरुष देऊ शकतो. हा काही गोष्टी नाही आहेत. पण त्यासाठी मला आता लग्न करण्याची गरज नाही”. पूजाने पुढे तिला प्रश्न विचारला की, “जर तुम्ही दुसरं लग्न केलंत तर करियर सोडाल का?”, त्यावर अमृता म्हणाली की, “नाही. यासाठीच मला दुसरं लग्न करायचं नाही. मला हे माहीत असावं की माझी बिल्स भरणारं कोणीही नाही. त्यामुळे मला काम करणं गरजेचं आहे”.

आणखी वाचा – Video : दुबईत पोहोचले ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रभाकर मोरे, रस्त्यावरच ‘शालू’वर केला भन्नाट डान्स, साधेपणाने वेधलं लक्ष

अमृता यांनी सैफबरोबर लग्न केल्यानंतर तब्बल १२ वर्ष अभिनय सोडला होता. त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी आपल्या करियरवर लक्ष केंद्रित करायचे ठरवले. त्या ‘शूटआऊट अट लोखंडवाला’, ‘दस कहानिया’, ‘कलियुग’ या चित्रपटांमध्ये दिसून आल्या होत्या.

Tags: Amrita singhsaif ali khansecond marriage
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Next Post
Aamir Ali reacted to ex wife Sanjeeda Shaikh's statement about her divorce

घटस्फोटानंतर संजीदा शेख व आमिर अलीची एकमेकांवर चिखलफेक, १२ वर्ष संसार केल्यानंतर एकमेकांना वैतागले कारण…; म्हणाला, "खूप वाईट…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.