सोमवार, जून 2, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सैफ अली खानच्या घरी याआधी गेला होता गुन्हेगार?, अटकेत असलेल्या आरोपीबद्दल पोलिसांची सविस्तर माहिती, केले मोठे खुलासे

Shamal Sawantby Shamal Sawant
जानेवारी 19, 2025 | 3:38 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
mumbai police on saif ali khan attack

गुन्हेगाराबद्दल काय म्हणाले मुंबई पोलिस?

अभिनेता सैफ अली खानवर १६ जानेवारी रोजी राहत्या घरात हल्ला झाला. चोरीच्या बहाण्याने घरात घुसलेल्या हल्लेखोराने सैफवर चाकूने सहा वार केले. या हल्ल्यामध्ये सैफ गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सैफवर हल्ला झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी गुन्हेगाराचा तपास सुरु केला. अनेक सीसीटीव्ही फुटेजदेखील ताब्यात घेतले. यामध्ये जी व्यक्ती दिसून आली होती तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मात्र आता तब्बल ७० तासांनी पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले आहे. पोलिसांनी आरोपीला शनिवारी रात्री ठाणे परिसरातून अटक केली आहे. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली. (mumbai police on saif ali khan attack)

सैफवरील हल्लाप्रकरणातील गुन्हेगाराला पकडण्यासाठी ३५ टीम बनवण्यात आल्या होत्या. तसेच या प्रकरणी ५० जणांची चौकशीदेखील करण्यात आली. पोलिसांनी सैफच्या घराच्या आसपास तसेच लोकल व एक्सप्रेस ट्रेनची सर्व फुटेजदेखील तपासली. आरोपी मुंबईबाहेर पळून जाऊ शकतो अशी शंका पोलिसांना होती. दरम्यान तपास करत करत पोलिस ठाणे परिसरात पोहोचले. तेथील हिरानंदानी परिसरात झाडंझुडपांमध्ये लपून बसला असल्याची माहिती मिळाली आणि त्याला त्या ठिकाणाहून अटक करण्यात आले.

आणखी वाचा – सैफ अली खानवरील हल्ल्याबद्दल बोलताना जॅकी श्रॉफ यांचा राग अनावर, म्हणाले, “जे झालं ते वाईट पण…”

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दरम्यान आता पोलिसांनी गुन्हेगाराची माहिती उघड केली आहे. आरोपीचं खरं नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असून तो बांगलादेश येथील रहिवासी आहे. पोलिसांनी हल्ल्याच्या वेळी काय झालं? याबद्दलही खुलासा केला. त्यांनी सांगितले की, “आरोपी बांगलादेश येथे राहणारा आहे. तो अवैधरित्या भारतात घुसला होता. त्याच्याकडे कोणतेही कायदेशीर भारतीय कागदपत्रं नाहीत. तसेच तो  चोरीच्या उद्देशाने सैफच्या घरात घुसला होता. आरोपी सहा महिन्यांपूर्वी मुंबईमध्ये आला आणि आजूबाजूच्या परिसरात राहू लागला. नंतर तो पुन्हा निघून गेला. सैफवर हल्ला करण्याच्या १५ दिवस आधी तो मुंबईमध्ये परतला. पकडला जाऊ नये यासाठी तो सतत नाव बदलत राहिला”.

आणखी वाचा – शाळेचं केलेलं नुकसान भरून काढण्यासाठी ‘दहावी-अ’च्या मुलांचं घरकाम, आभ्याला मदत करणं केवडाला महागात पडणार

पुढे पोलिसांनी सांगितले की, “सध्या तो विजय दास नावाने मुंबईमध्ये राहत होता. त्याच्यावर आता भारतीय दंड संहितेनुसार,  कलम ३११, ३१२, ३३१ (४), ३३१ (६) व ३३१ (७) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी याआधीदेखील सैफच्या घरी गेला होता. तो आधी हाऊसकीपिंग एजन्सीमध्ये काम करत होता. त्यामुळे त्या कारणामुळे घरी गेला होता. मात्र पोलिसांनी या माहितीमध्ये तथ्य नसल्याचे सांगितले आहे.    

Tags: attackerbollywoodmumbai policesaif ali khan
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Premachi Goshta fame Swarda Thigales car accident
Entertainment

‘प्रेमाची गोष्ट’मधील मुक्ताचा अपघात, गाडी चालवताना झोप लागली अन्…; अभिनेत्रीचं मोठं नुकसान

जून 2, 2025 | 5:58 pm
Vaishnavi Hagawane Death
Entertainment

वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळ कोणाजवळच राहीना, आईविना लेकराचे रडून-रडून हाल, हृदयस्पर्शी व्हिडीओ समोर

जून 2, 2025 | 5:00 pm
Radhika Apte Motherhood
Entertainment

बाळ होण्याच्या एक दिवस आधीपर्यंत केलं काम, अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतील सत्य, म्हणाली, “इथं काम करणं…”

जून 2, 2025 | 3:30 pm
Gauahar Khan on suniel Shetty
Women

“सी-सेक्शन म्हणजे आराम”, सुनिल शेट्टींच्या वक्तव्यावर भडकली सुप्रसिद्ध अभिनेत्री, म्हणाली, “अनुभवलं नाही मग बोलले कसे?”

जून 2, 2025 | 2:51 pm
Next Post
vishakha subhedar on husband

“तुझं खूप कौतुक...”, विशाखा सुभेदार यांनी नवऱ्यासाठी शेअर केली खास पोस्ट, म्हणाल्या, “नाटकाचा पहिला प्रयोग आणि वाढदिवस...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.