‘तू माझी पुरणपोळी रे’ या नव्या गाण्याच्या पोस्टरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. होळीच्या ऐन मुहूर्तावर मराठीमध्ये प्रदर्शित झालेलं हे एक धमाकेदार गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘तू माझी पुरणपोळी रे’ असं या गाण्याचं नाव आहे. यामध्ये एका लोकप्रिय कलाकार जोडीने ठेका धरला आहे. अभिनेत्री योगिता चव्हाण व अभिनेता सौरभ चौघुले यांचा धमाकेदार डान्स गाण्यामध्ये पाहायला मिळतोय. सोशल मीडियावर या गाण्याची बरीच चर्चा रंगली आहे. (tu mazi puranpoli re song out)
‘मीडिया वन सोल्युशन’ प्रस्तुत व ‘इट्स मज्जा’ ओरिजिनल ‘तू माझी पुरणपोळी रे’ गाण्याचं पोस्टर प्रदर्शित झालं तेव्हापासून हे गाणं केव्हा येणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. मराठीतील नवविवाहित जोडपं सौरभ चौघुले व योगिता चव्हाण गाण्यात धमाल करताना पाहायला मिळत आहेत. होळीच्या रंगामध्ये बेधुंद होऊन नाचताना दोघेही खूप सुंदर दिसत होते. गाण्यासाठी योगिताचा लूक अगदी खुलून आला. तर सौरभही डान्स करण्यात मग्न असलेला दिसतोय. लग्नानंतर त्यांचा हा पहिलाच एकत्रित प्रोजेक्ट आहे. शिवाय या दोघांची जोडीही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे. तर रोहित राऊत व जुईली जोगळेकरने या गाण्याला आवाज दिला आहे. म्हणजेच गाण्यासाठी आवाज दिलेले गायकही खऱ्या आयुष्यातील एकमेकांचे जीवनसाथी आहेत.
‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतून सौरभ व योगिता ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीस आली. मालिका संपल्यानंतरही ही जोडी प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. अखेर आता या जोडीने लग्न केले असून दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. त्यानंतर ही जोडी पुन्हा केव्हा पडद्यावर झळकणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. अखेर आता योगिता व सौरभ हे लग्नानंतर पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र आले आहेत. ‘तू माझी पुरणपोळी रे’ या गाण्यातून या जोडीला एकत्र पाहणं रंजक ठरत असून चाहतेही दोघांवर भरभरुन प्रेम करत आहेत.
‘मीडिया वन सोल्युशन’ प्रस्तुत व ‘इट्स मज्जा’ ओरिजिनल होळी स्पेशल हे गाणं सिनेरसिकांच्या भेटीस आलं आहे. या गाण्याचे गीतकार श्रीपाद जोशी आहेत. ‘इट्स मज्जा’ या युट्युब चॅनेलवर हे गाणं प्रदर्शित झालं असून साऱ्या रसिकांना थिरकायला भाग पाडत आहे.