गेल्या अनेक दिवसांपासून ज्या लग्नाची सर्वच प्रसार माध्यमांमध्ये चर्चा रंगली होती, तो लग्न सोहळा अखेर पार पडला आहे. काल मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट दोघेही विवाहबंधनात अडकले. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये झालेला हा विवाह अनेक वर्षे स्मरणात राहील. या लग्नाला देशातील आणि जगातील अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती. काल रात्री या जोडप्याने एकमेकांबरोबर सप्तपदी घेतली. या लग्नाला देश-विदेशातील अनेक पाहुणे उपस्थित होते. यादरम्यान अनंतच्या लग्नाच्या मिरवणुकीत बड्या सेलिब्रिटींनी भरपूर डान्स केला.
अशातच या लग्नातील एका अभिनेत्याकया डान्सने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आणि हा अभिनेता म्हणजे रणवीर सिंह. रणवीर सिंह हा बॉलिवूडचा एनर्जीटीक स्टार म्हणून लोकप्रिय आहे. त्याच्या एनर्जीच्या चर्चा अनेकदा रंगल्या आहेत. अशातच अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नातील खास डान्समुळेही त्याने सर्वांचेचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते. त्याच्या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओला त्याच्या चाहत्यांनीदेखील पसंती दर्शवली आहे.
आणखी वाचा – मोठा वाद?, बच्चन कुटुंबीयांची वेगळी एण्ट्री, ऐश्वर्या बच्चन लेकीला घेऊन एकटीच आली अन्…; नक्की घडलंय काय?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या रणवीर सिंहच्या व्हिडीओमध्ये तो डीजे चेतासबरोबर दमदार परफॉर्मन्स करताना दिसत आहे. रणवीर सिंहचा हा धमाकेदार डान्स पाहून अनंत अंबानीचे लग्न नसून त्याचेचं लग्न झालं आहे की काय असंच म्हणावं लागेल. रणवीरने सलमान खानच्या चित्रपटातील ‘मुझसे शादी करोगी’ या गाण्यावर धमाकेदार डान्स केला आहे. रणवीर सिंहची धमाकेदार डान्सशैली या गाण्याशी अगदीच जुळत असून त्याच्या या डान्समुळे लग्नाला आणखी चार चाँद लागले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
दरम्यान, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचे सर्व विधी मध्यरात्री १२.३० दरम्यान पूर्ण झाले. वधू-वरांच्या लुकबद्दल सांगायचं झालं तर अनंत अंबानी लाल रंगाच्या शेरवानीमध्ये होता, तर ऑफ व्हाईट रंगाचा लेहंगा आणि त्यावर लाल रंगाने केलेले वर्क यामध्य नववधू राधिका अप्रतिम दिसत होती. अंबानी कुटुंबाची धाकटी सून लाल दुपट्ट्यासह पांढऱ्या लेहेंग्यात खूप सुंदर दिसत होती. गुजराती वधूचा लूक तिला खूप शोभत होता.