सध्या स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटामुळे अभिनेता रणदीप हुड्डा चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनवेळी त्याने चित्रपटसृष्टीतील अनेक प्रकरणांवर भाष्य केले आहे. अभिनय क्षेत्रातील घराणेशाहीवर त्याने आजवर कोणतेही भाष्य केले नव्हते. पण अशातच आता त्याने अभिनेत्री कंगना रणौत व आलिया भट्ट यांच्याबद्दल भाष्य केले आहे. एका मुलाखतीमध्ये त्याने दोघींच्या भांडणावर बोलला आहे. (Randeep Hudda on kangana ranaut)
सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर कंगनाने बॉलिवूडमधील घराणेशाहीवर अनेकदा ताशेरे ओढले आहेत. त्यामध्ये तिने आलियावरदेखील निशाणा साधला आहे. आलियाचा ‘गली बॉय’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कंगनाने आलियाच्या अभिनयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावेळी रणदीपने आलियाची बाजू घेत ट्विट शेअर केले होते. या ट्विटमध्ये त्याने लिहिले होते की, “प्रिय आलिया, मला आशा आहे की इतर कलाकारांच्या मताकडे लक्ष देण्याची गरज नाही. तुझ्या चांगल्या कामासाठी खूप शुभेच्छा”.
आता पुन्हा एकदा रणदीप आलियाच्या बाजूने भाष्य केले आहे. नुकताच त्याने सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखत दिली. त्यामध्ये त्याने सांगितले की, “ ‘हायवे’ चित्रपटाच्या दरम्यान आलिया व माझ्यामध्ये एक धार्मिक कनेक्शन तयार झाले. म्हणजे हे मत माझं आहे. मी तिला सतत नवीन काहीतरी करताना पाहिलं आहे. मी त्यावेळी खर्च तिच्या बाजून उभा होतो कारण ती विनाकारण लक्ष्य केले जात होते”.
तसेच त्याने कंगनाबद्दल सांगितले की, “आपल्या बरोबर असणाऱ्या कलाकारांना व सहकाऱ्यांना लक्ष्य करणे चुकीचं आहे. मला असं वाटत की या क्षेत्राण तुला खूप काही दिलं आहे”, असं बोलून त्याने कंगनाला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. कंगनाने आतापर्यंत अनेक कलाकारांबरोबर वैर घेतले आहे. तिने अनेकांवर बेधडक वक्तव्यदेखील केली आहेत. अशातच तिने आता राजकारणामध्ये प्रवेश केला असून मनोरंजन क्षेत्रामध्ये सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. ती हिमाचल प्रदेशमधील मंडी या भागातून भाजपचं नेतृत्त्व करणार आहे.
रणदीपबद्दल बोलायचे झाले तर त्याचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्यामध्ये तो मुख्य भूमिकेमध्ये दिसला आहे. तसेच या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने पहिल्यांदाच दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे.