ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांनी मे २०२० मध्ये जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे कपूर परिवारासह संपूर्ण बॉलिवूड विश्वाला धक्का बसला होता. अशातच आता चार वर्षांनंतर त्यांचा मुलगा व लोकप्रिय अभिनेता रणबीर कपूरने खुलासा केला आहे की, वडील ऋषी कपूर यांचे निधन झाले तेव्हा तो अजिबात रडला नव्हता. रणबीरने हेदेखील सांगितले आहे की, ऋषी कपूर यांच्या जीवंतपणी रणबीर आपले वडिलांबरोबरचे नाते सुधारू शकले नाही. त्यामुळे त्याला आता अपराधीपणासारखे वाटत आहे. निखिल कामथला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रणबीर कपूर म्हणाला की, “मी खूप दिवसांपासून रडलो नाही. माझे वडील गेले तेव्हाही मी रडलो नाही. जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा डॉक्टरांनी मला सांगितले की होते ही त्यांची (ऋषी कपूर यांची) ती शेवटची रात्र होती आणि ते कधीही जाऊ शकतात”.
याबद्दल पुढे बोलताना रणबीर असं म्हणाला की, “मला आठवतं की, मी रुममध्ये गेलो तेव्हा त्यावर त्यावर कसं व्यक्त व्हावं मला कळलच नाही. मला कसे व्यक्त करावे हेच कळत नव्हते. अजून बरंच काही चालू होतं जे सहन करावं लागलं. पण मला वाटत नाही की मी शोक व्यक्त केला आहे आणि याचं नुकसान मला आता समजत आहे”. यापुढे रणबीरने वडिलांमधील त्याच्या अंतराबद्दल असं म्हटलं की, “मला वडील ऋषी कपूर यांच्याबरोबरचे अंतर कमी करता आले नाही याचीही खंत आहे. वडिलांवर जेव्हा उपचार सुरू होते, तेव्हा आम्ही न्यूयॉर्कमध्ये एक वर्ष एकत्र घालवले होते. मी ४५ दिवस तिथे होतो आणि एके दिवशी पप्पा आले आणि रडू लागले. याआधी त्यांनी माझ्यासमोर अशी कमजोरी कधीच दाखवली नव्हती”.
आणखी वाचा – “आमचं ठरलंय” म्हणत अक्षया देवधरने सांगितली गुडन्यूज, खास पोस्टही शेअर केली अन्…; म्हणाली, “लवकरच…”
तसेच यापुढे रणबीर मला या सगळ्याबद्दल आता अपराधी वाटत असल्याचे म्हटलं. याबद्दल तो असं म्हणाला की, “माझ्यासाठी हे सगळं खूप त्रासदायक होतं कारण मला कळत नव्हतं की मी नक्की काय करावं. मला खरंच आमच्यामधील अंतर जाणवलं. मला आता अपराधी वाटतं आहे. तेव्हा त्यांना थोडं प्रेम देण्याची हिंमत माझ्यात नव्हती”.
आणखी वाचा – “बिग बॉसने माझ्याबरोबर…”, बाहेर येताच शिवानी कुमारीचा मोठा आरोप, म्हणाली, “घाणेरडा खेळ…”
यापुढे रणबीरने वडिलांच्या निधनानंतर रडला नसल्याच्या आरोपांवरही उत्तर दिले. याबद्दल त्याने असं म्हटलं की, “हे सगळं माझ्यामुळे झालं असा अनेकांचा आरोप आहे. पण मला आई, बहीण, पत्नी व एक मूल आहे आणि तेव्हाच माझे वडील गेले. या सगळ्यांसमोर मी माझी कमजोरी दाखवू शकतो का? ते काय असतं हे मला माहीत नाही, पण मी तेव्हा रडू शकलो नाही”.