शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बॉलिवूड अभिनेत्याचा मुंबईमध्ये झाला होता मोठा अपघात, आयसीयूमध्ये दाखल केल्यानंतर अशी झाली आहे अवस्था

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 22, 2024 | 3:09 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bollywood actor Parvin Dabas car accident in Mumbai now condition is stable see the details

बॉलिवूड अभिनेता परवीन दाबासचा झाला होता भीषण कार अपघात, आता प्रकृती कशी?

बॉलिवूड अभिनेता परवीन दाबासचा भीषण कार अपघात झाल्याची धक्कादायक बातमी काल (शनिवार २१ सप्टेंरबर) समोर आली. परवीन दाबासचा भीषण कार अपघात झाला असून त्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळाली. गंभीर जखमी अवस्थेत अभिनेत्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. अशातच आता नुकतेच त्याच्या तब्येतीबद्दलची अपडेट समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. मेडिकल अपडेटनुसार, प्रवीणला गंभीर दुखापत झाली असल्याचे सांगण्यात आले होते. त्याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्याचे म्हटलं होतं. अभिनेत्याला आणखी दुखापत झाली आहे का, हे पाहण्यासाठी डॉक्टरांकडून सीटी स्कॅन आणि इतर चाचण्या करण्यात आल्या.

त्यानंतर झूमच्या अहवालानुसार, सूत्रांनी परवीन दाबासच्या प्रकृतीबद्दल माहिती देताना सांगितले की, सध्या त्याच्यासाठी वैद्यकीय सेवा आवश्यक आहे. एमआरआय, सोनोग्राफी आणि एक्स-रेच्या आधारे डॉक्टर त्याच्या प्रकृतीची तपासणी करत आहेत. त्यानंतर आता त्यांची प्रकृती ठीक असून ते बोलतही आहेत. रुग्णालयात दाखल केल्यानंतर अभिनेत्याने पाठदुखी आणि गुडघेदुखीबद्दल सांगितले होते. प्रवीणच्या चेहऱ्यावर किंवा डोक्यावर कुठलीही जखम नव्हती आणि त्याच्या शरीरात रक्तस्त्रावही झालेला नाही.

View this post on Instagram

A post shared by Parvin Dabas (@dabasparvin)

आणखी वाचा – ‘लाफ्टर शेफ’च्या सेटवर एकामागून एक भीषण अपघात, राहुल वैद्यवर उडाला आगीचा मोठा भडका, रीम शेखचाही चेहरा भाजला अन्…; नेमकं काय झालं?

परवीन दाबास हा आर्म रेसलिंग प्रो पंजा लीगचा सह-संस्थापक आहे. प्रो पंजा लीगने काल अभिनेत्याच्या अपघाताच्या निवेदनात सांगितले होते की, “प्रो पंजा लीगचे सह-संस्थापक परवीन दाबास यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे आम्हाला दुःख होत आहे. शनिवारी सकाळी झालेल्या दुर्दैवी कार अपघातानंतर त्यांना वांद्रे येथील होली फॅमिली हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले”.

आणखी वाचा – The Family Man 3 मध्ये ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्याची एण्ट्री, खास लूकने वेधलं लक्ष, नेमकी भूमिका काय?

दरम्यान, बॉलिवूड अभिनेता परवीन दाबासचे वय ५० वर्ष आहे. अभिनेता अनेक चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिकांमध्ये दिसला आहे. परवीन दाबासने आतापर्यंत ‘दिल्लगी’, ‘मान्सून वेडिंग’, ‘खोसला का घोंसला’, ‘द हीरो : लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय’, ‘मैने गांधी को नही मारा’, ‘ये है जिंदगी’, ‘कुछ मीठा हो जाए’, ‘इंदू सरकार’, ‘रागिनी एमएमएस २’ आणि अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

Tags: Parvin DabasParvin Dabas Accident Marathi NewsParvin Dabas Accident News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 new promo

Bigg Boss Marathi 5 च्या घरामधून निक्की पडली बाहेर?, अरबाजला मिठी मारत ढसाढसा रडू लागली अन्...; प्रोमो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.